Raju Shetti esakal
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : तब्बल 36 तासांनंतर राजू शेट्टींचं आंदोलन मागे, पण 'या' 15 कारखान्यांविरुद्ध लढा राहणार सुरू!

जिल्ह्यातील १५ कारखान्यांविरोधात आंदोलन सुरूच राहील, असे माजी शेट्टी यांनी स्पष्ट केले.

सकाळ डिजिटल टीम

ऊसदर जाहीर करून ‘दत्त इंडिया’ने ऊसदर आंदोलनात तोडगा काढण्याची तयारी दर्शवली, अन्य कारखाने काय करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

सांगली : सांगलीमधील दत्त इंडिया प्रा. लि. (वसंतदादा) साखर कारखान्याकडून (Datta India Sugar Factory) स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे सोमवारी (ता. ११) रात्री उशिरा मान्य करण्यात आले. ३६ तासांपासून वसंतदादा साखर कारखान्यासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी रात्री उशिरा मागे घेतले.

मात्र, जिल्ह्यातील १५ कारखान्यांविरोधात आंदोलन सुरूच राहील, असे माजी शेट्टी यांनी स्पष्ट केले. ऊसदर जाहीर करून ‘दत्त इंडिया’ने ऊसदर आंदोलनात तोडगा काढण्याची तयारी दर्शवली, अन्य कारखाने काय करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक १०० रुपये आणि गत हंगामातील ५० व १०० रुपये थकीत देणे द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रविवारपासून (१०) सांगलीतील दत्त इंडिया कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले. आंदोलन सुरू झाल्यावर बैठकाही झाल्या. मात्र, त्या निष्फळ ठरल्या. त्यामुळे संघटना आक्रमक झाली. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेतखाली पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. त्यातही तोडगा निघाला नसल्याने निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

रात्री दहानंतर ‘दत्त इंडिया’ प्रशासनाने मागणीनुसार दर देण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वाभिमानीला ‘दत्त’कडून मिळालेल्या पत्राला अनुसरून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे मान्य करत असल्याचे लेखी पत्र देण्यात आले. त्यामुळे शेट्टींनी वसंतदादा कारखान्यासमोर सुरू असलेला काटा बंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. १५ कारखान्यांविरोधात आंदोलन सुरूच राहील, असेही स्पष्ट केले.

शनिवारी पुन्हा बैठक

‘दत्त इंडिया’ने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडली. अन्य साखर कारखान्यांनी स्वभिमानी शेतकरी संघटनेने केलेली मागणी मान्य केली नसून त्यांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १६) पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT