पश्चिम महाराष्ट्र

Video : युवा पिढीने विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श घ्यावा : प्राचार्य पवार

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (जि. सातारा) : येथील महाराजा शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य श्री.पवार यांच्यासह माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा -  Video : माेदींच्या पुस्तकाविषयी उदयनराजे म्हणाले...
 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य पवार म्हणाले, घराघरात जिजाऊंच्या मार्गदर्शनातून म्हणजेच आईच्या मुलांवरील संस्कारातून शिवबा घडणेही गरजेचे आहे. आजच्या युवा पिढीने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे आदर्श घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन येणार्‍या काळात या युवा पिढीकडून अखंड भारतात प्रगतीस हातभार लागेल.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह होता. संपुर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात चित्ररथासह मिरवणुकही काढण्यात आली. यावेळी शाळेच्या विद्याथीनींनी सादर केलेले लेझीम पथकाने उपस्थितांचे 
लक्ष वेधून घेतले. विद्याथ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून भगवे फेटे परिधान केले होते. तर मुलींनी नउवारी साडी परिधान केल्या होत्या, शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिमांची पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली.

हेही वाचा -  माेदींच्या पुस्तकाविषयी शिवेंद्रसिंहराजे बाेलले आता उदयनराजेंकडे लक्ष

विद्यालयात स्वामी विवेकानंद सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याने रांगोळी स्पधेर्सह, निबंध, वक्तृत्व व मैदानी खेळ व स्पधार्चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलीस नव्हेत, RSSचे गुंड', दीपकेंचे आरोप; वांगचुक रुग्णालयात, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

SIR ला हलक्यात घेऊ नका... तुमचं नाव मतदार यादीतून कट होणार? नंतर काय कराल? सोप्या भाषेत माहिती

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर; सफदरजंग रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली उपचार

Satej Patil SIR Process : SIR प्रक्रियेला केवळ ८ दिवसांची मुदतवाढ, मतदारांच्या डोळ्यात धूळफेक; सतेज पाटलांची सरकारवर जोरदार टीका

Nagpur News: नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस-वे २०२७ पर्यंत पूर्ण होणार; देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा नवा कॉरिडॉर साकारणार

SCROLL FOR NEXT