पश्चिम महाराष्ट्र

"तबलीक'तील साताऱ्यातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 22 संशयित दाखल; 41 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कऱ्हाडमधील कृष्णा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तांबवे (ता. कऱ्हाड) येथील 35 वर्षांच्या युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन झाली आहे. दरम्यान, काल सायंकाळपासून कोरोनासदृश लक्षणांमुळे 22 संशयितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर 41 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
 
राज्यामध्ये दररोज कोरोनाचे संशयित रुग्ण वाढत असताना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मात्र, नवीन बाधित रुग्ण आढळला नव्हता. गुरुवारी ता. 2 एप्रिल कोरोना बाधितांच्या संख्येत एकाने वाढ झाली आहे.
 
जिल्ह्यामध्ये यापूर्वी एक महिला व एक पुरुष असे कोरोनाचे दोन बाधित रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कऱ्हाडमध्ये आढळलेला तरुण कोरोनाचा तिसरा रुग्ण ठरला आहे. जिल्हा रुग्णालयात काल दाखल झालेल्या व अहवाल प्रलंबित असलेल्या अशा एकूण 41 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 23, तर "कृष्णा'त दाखल असलेल्या 23 जणांचा समावेश आहे. परदेशातून प्रवास करून आलेले नऊ व बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या नऊ अशा 18 संशयितांना कोरोनासदृश्‍य लक्षणे असल्याने काल रात्री उशिरा दाखल करण्यात आले होते.

त्यामध्ये जिल्हा रुग्णालयात तीन, तर "कृष्णा'त 15 जणांना दाखल करण्यात आले. परदेश प्रवास करून आलेल्यांमध्ये पाच पुरुष व चार महिला आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये 20 ते 84 वयोगटातील पाच पुरुष व दोन महिला, तसेच एक वर्षाच्या मुलाचा व मुलीचाही त्यात समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात तीन, तर येथीलच एका खासगी रुग्णालयात एका संशयित रुग्णाला कोरोनासदृश्‍य लक्षणे असल्यामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दाखल केलेल्या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नुमने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. 

Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन; तांबव्यात हाय अलर्ट


"तबलीक'तील साताऱ्यातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह
 
दिल्लीतील निजामुद्दीनत झालेल्या मेळाव्यात जिल्ह्यात सात जणांचा समावेश असल्याचे समोर आले होते. त्यांची ओळख पटल्यानंतर प्रशासनाने त्या सातही जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्यातील तिघांचे अहवाल काल निगेटिव्ह आले होते. गुरुवारी (ता. 2) अन्य चौघांचे अहवालही निगेटिव्ह आले. त्यामुळे "तबलीक'मधील कोणाला अद्याप कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 


कोरोना इफेक्‍ट... 

  • जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले; कऱ्हाडातील जनता कर्फ्यू रद्द 
  • वाईत जनता कर्फ्यूला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद 
  • नववधूच्या मेंदीचा कार्यक्रम पोलिस ठाण्यात 
  • जिल्ह्यात 156 व्हेंटिलेटरची सज्जता 
  • सज्जनगड, चाफळ व गोंदवले बुद्रुकला रामनवमी साधेपणाने 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT