Taluka Panchayat Engineer in ACB Arrested for accepting bribe Action of Athanit Squad 
पश्चिम महाराष्ट्र

तालुका पंचायत अभियंता एसीबी जाळ्यात ; मंजुरीच्या मोबदल्यात मागितली लाच

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव  : वजन माप खात्याचे सहाय्यक नियंत्रक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्याची मंगळवारी घडलेली घटना ताजी असताना आज  परत अथणीतील तालुका पंचायत कार्यालयामधील अभियंता (रोहयो विभाग) एसीबी सापळ्यात अडकला. रोजगार हमी योजनेखाली केलेल्या कामाचे बिल मंजुरीच्या मोबदल्यात लाच मागितल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे. 

अथणीमधील तालुका पंचायत कार्यालयात अभियंता (नरेगा विभाग) म्हणून नागाप्पा भीमाप्पा मोकाशी सेवा बजावीत. पाणलोट क्षेत्राचा विकास आणि कृषी तलावाचा विकास रोजगार हमी योजनेखाली केला आहे. कामाच्या मोबदल्यामध्ये बिल मंजुरीसाठी मोकाशी याच्याकडे सातत्याने फिर्याददार अंबरीश सोमलिंग दुग्गणी (रा. अनंतपूर, ता. अथणी) यांनी पाठपुरावा केला. पण, त्याची दखल घेण्यात येत नव्हती. शिवाय बिल मुंजरीसाठी चालढकल केली जात होती.

अखेरला अधिकाऱ्यांनी बिलाच्या मोबदल्यात सहा हजाराची लाच देण्याची मागणी केली. पैसे देण्याची तयारी दाखविल्यानंतर पहिल्या टप्प्यात तीन हजाराची लाच देण्याचे ठरले. त्यानुसार आज तीन हजार रुपये अधिकाऱ्यांकडे देताना एसीबी अधिकाऱ्यांनी छापा घालून ताब्यात घेतली. अधिकाऱ्याची अंगझडती घेतल्यानंतर लाचची रक्कम मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यावर लाच प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा नोंदविला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक उपायुक्त शरणाप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक ए. एस. गुडीगोप्प, सुनिलकुमार यांनी कारवाई केली. 

उत्पन्नापेक्षा अधिक स्त्रोतबद्दल वजन माप खात्याच्या सहाय्यक नियंत्रक एसीबी जाळ्यात मंगळवारी अडकले. पण, आज परत अभियंता एसीबी जाळ्यामध्ये अडकल्याने प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेण्यात येत आहे. निलंबनाच्या कारवाईसाठी प्रस्तावाची प्रतिक्षा केली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT