Tasgaon Mandal Officer esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : मंडल अधिकाऱ्यासह तिघांना लाच घेताना अटक; शेत जमीन नोंदीसाठी घेतले 'इतके' पैसे

Tasgaon Mandal Officer : वायफळे येथील एकाने जमीन खरेदी केली होती. या खरेदीची दस्तनोंदणी करण्यासाठी अर्ज देण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी अर्जदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी वाले यांनी संभाजी बाबर यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची मागणी केली होती.

तासगाव : वायफळे (ता. तासगाव) येथील एका शेत जमिनीची (Agricultural land) नोंद करण्याठी सात हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) केलेल्या कारवाईत मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले, कोतवाल प्रवीण प्रकाश माने आणि खासगी इसम दत्तात्रय ऊर्फ संभाजी बाबर या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत तासगाव पोलिसांत (Tasgaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वायफळे येथील एकाने जमीन खरेदी केली होती. या खरेदीची दस्तनोंदणी करण्यासाठी अर्ज देण्यात आला होता. या अर्जाची सुनावणी मंडल आधिकारी वैशाली वाले यांच्यासमोर सुरू होती. याप्रकरणी अर्जदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी वाले यांनी संभाजी बाबर यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीमध्ये तक्रारदाराने सात हजार रुपये देण्याचे मान्य करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची शहनिशा करून सापळा लावण्यात आला होता.

आज (ता. १) मंडल अधिकारी वैशाली वाले यांच्या सांगण्यावरून लोकसेवक कोतवाल प्रवीण प्रकाश माने याने सात हजार रुपयांची लाच घेत असताना पंचांसमक्ष त्यांना रंगेहात पकडण्यात आले. वाले, माने आणि बाबर यांच्या विरोधात तासगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक उमेश पाटील यांच्यासह पोलिस पथकाने केली. शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन या विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT