पश्चिम महाराष्ट्र

शेवटचा नांगर तुटला अन् जहाज भरकटले; राहुलने अनुभवला 11 तासांचा थरार

शिवाजीराव चौगुले

शिराळा : समुद्रात जहाज बुडू लागल्याने काही ही झाले तरी मरण हे अटळ आहे हे समजून समुद्रात उडी मारून पोहायला सुरवात केली. त्यावेळी डोळ्यासमोर आई, वडील आणि लहान बहिणीचा चेहरा दिसत होता. जीव वाचवण्यासाठी पोहत असतानाच समोर नेव्हीचे जहाज दिसले. (tauktye cyclone) जगण्याच्या अशा पल्लवीत होताच समुद्राच्या लाटेने जोराची धडक दिल्याने आम्ही दूर फेकलो गेलो. आता आपण संपलो हे समजून डोळ्यातले अश्रू वाहू लागले. ११ तासांचा थरार अनुभवला शिराळा तालुक्यातील निगडी येथील २२ वर्षीय राहुल रामचंद्र साळुंखे या युवकाने.

राहुल शेतकरी कुटुंबातील. गेले दोन वर्षापासून हा मॅथ्यू ऑफशोरी असोसिएट कंपनीत सहायक फिटर आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीही कंपनी ओएनजेसीचे काम करण्यासाठी अरबी समुद्रात (arabiansea) गेली होती. ३ नोव्हेंबर २०२० रोजी जहाज पी-३०५ मधून राहुलसह एकूण २७३ जण कामासाठी गेले होते. ६ महिन्याचे काम होते. ते जहाज हीरा ऑईल फिल्ड हच टी प्लॅटफॉर्म इथे काम करत होते. ते काम ही पूर्ण होत आल्याने ते सर्वजण मुंबईला येणार होते.

वादळाची माहिती मिळाली त्यामुळे जहाज बाहेर न काढता प्लॅटफॉर्म पासून २०० मीटर अंतरावर स्टँडबाय केले. १६ मे रोजी रात्री १० नंतर हवेचा जोर आणि लाटांची तीव्रता वाढली. एकूण आठ नांगर होते. एकेक नांगर तुटण्यास सुरवात झाली. १७ मे रोजी सकाळी ८. २० मिनिटाने जहाजाचा शेवटचा नांगर तुटल्याने हवेच्या वेग आणि पाण्याच्या उसळणाऱ्या प्रचंड लाटा यामुळे जहाज भरकटले. लाटांच्या प्रचंड वेगाने जहाज २ वेळा हच टी प्लॅटफॉर्म जाऊन धडकल्याने जहाजाला छिद्र पडले.

जहाजमध्ये पाणी भरण्यास सुरवात झाली. हळूहळू जहाज पाण्यात बुडत होते. कॅप्टनने इंडियन नेव्हीला मदतीसाठी कळवले. तोपर्यंत जहाज पाण्याने मूळ जागेपासून सुमारे ९० किलोमीटर दूर गेले होते. जहाज बुडत असताना सर्वांनी लाईफ ड्रफ्ट उगडले पण ते पंक्चर होत होते. नंतर सुमारे ३ च्या सुमारास इंडियन नेव्हीची मदत आली पण त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. जहाजाचा शेवटचा भाग शिल्लक होता.

त्यावेळी प्रसंगावधान राखून कॅप्टनने पाण्यात उडी मारण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यावेळी सर्वांनी लाईफ जॅकेट घालून सायंकाळी ४ च्या सुमारास पाण्यात उड्या मारल्या. अन तोपर्यंत मागे जहाज बुडाले. सर्वजण जिवाच्या आकांताने पाण्यामध्ये पोहत असताना ९ वाजण्याच्या सुमारास त्यांना इंडियन नेव्हीचे जहाज दिसले. पण नेव्हीच्या जहाजापर्यंत पोहचणार तोच जोराची लाट आली. त्यासोबत सर्वजण जहाज पासून दूर गेले. त्यावेळी सर्वजण एकमेकांना धीर देत नेव्हीच्या जहाजाची वाट पाहत होते. सर्वजण १० तास पाण्यात तरंगत मदतीची वाट पाहत होतो. शेवटी २ वाजता इंडियन नेव्हीच्या आयएनएस कोची ने सर्वांना वाचवले.

त्याचा फोन आला अन् आम्ही सुटकेचा श्वास सोडला

ज्यावेळी घटना घडली त्यावेळी वादळी वाऱ्याने विद्युत तार तुटल्याने चार दिवस राहुल यांच्या घरी लाईट नव्हती. त्यामुळे टीव्हीच्या बातम्या कळत नव्हत्या. दुसरीकडे जाऊन मोबाईल चार्जिंग केला तर अधून मधून समुद्रात जहाज बुडल्याचे कळायचे. त्यावेळी जीवाचा थरकाप होत होता. राहुलचा फोन पण लागत नव्हता. त्याच्या चौकशीसाठी आम्हाला दिसभर बाहेरून फोन येत होते. पण आम्हाला काहीच माहिती नसल्याने आम्हा सर्वांना चिंता लागून राहिली होती. मनात नको ते विचार येत होते. चार दिवसानी राहूलने मी सुखरूप असल्याचा फोन केला अन् सुटकेचा श्वास सोडला.

"जिवाच्या आकांताने पोहत समुद्र लाटांना भेदत होतो. त्या लाट समोर आमची शक्ती तोकडी पडत होती. त्या लाटेने अनेक सहकारी आमच्यापासून दूर गेले. शेवटी आम्ही चौघेजण एकत्रित होतो. त्यात आपल्या जिल्ह्यातील तासगाव येथील माझा मित्र शेखर शेळके होता. आमची शक्ती तोकडी पडत असली तरी जगण्याची जिद्द होती म्हणून आम्ही वाचलो."

- राहुल साळुंखे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT