Teachers speak the language of the heart 
पश्चिम महाराष्ट्र

वकील कायद्याची, गुरुजी काळजातली भाषा बोलतात! 

सकाळ वृत्तसेवा

नगर : ""शिक्षकांनी समाजातील ज्वलंत प्रश्‍न समजावून मुलांना नैतिकतेचे धडे देणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षक समाजातील महत्त्वाचा घटक आहे. आयुष्याची सुरवात ही क्रांतिकारी पावलाने होते. व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षकांनी नतमस्तक होऊन काम केले पाहिजे. कायद्याने कसे जगावे, हे आम्ही सांगतो. मात्र, शिक्षक, साहित्यिक काळजाची भाषा बोलतात. शिक्षकांवर अध्यापन सोडून अवांतर कामे लादू नयेत,'' अशी अपेक्षा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. 

जिल्हा गुरुकुल शिक्षक मंडळ, प्राथमिक शिक्षक समिती, गुरुकुल महिला आघाडी, उर्दू शिक्षक मुख्याध्यापक, पदवीधर, शिक्षक समिती, गुरुकुल सांस्कृतिक समितीतर्फे आज यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात गुरुकुल प्रतिभाविष्कार शिक्षक साहित्य संमेलन झाले. उद्‌घाटन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष आमदार लहू कानडे, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष राजेंद्र पटेकर, डॉ. संजय कळमकर, संजय धामणे, रज्जाक शेख, सुरेश सानप, वृषाली कडलग आदी उपस्थित होते. शिक्षकांच्या कलाविष्काराच्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन अभिनेते मोहिनीराज गटणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते झाले. 

गटणे म्हणाले, ""कला कोणतीही असो; ती व्यवस्थितपणे जोपासली पाहिजे. तीच कला कधी कोणत्या पदावर नेऊन बसवेल, याचा नेम नाही. क्षेत्र कोणतेही असो; शिक्षकाशिवाय पर्याय नाही.'' 
औटी म्हणाले, ""शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. मात्र, शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामे देऊन बहुरूपी केले आहे.'' 

कळमकर म्हणाले, ""जिल्ह्यातील शिक्षकांच्या यादीत 45 हून अधिक शिक्षक कवी आहेत. शिक्षकांना आता पगार वाढला नाही तरी चालेल. समाजात शिक्षकांची पत कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.'' सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले. 

शिक्षक स्वप्न साकारणारा जादूगार 
आमदार कानडे म्हणाले, ""शिक्षक समाजातील महत्त्वाचा घटक आहे. मुले विविध अंगांनी गुणवत्तेतून प्रगल्भ व्हावीत, यासाठी शिक्षकांकडून मुलांचे पालक आशावादी असतात. आई-वडिलांच्या मुलांचे स्वप्न साकार करणारे जादूगार म्हणूनही शिक्षकांकडे पाहिले जाते.'' 

"या, या, या, बसा आमच्या...' 
शिक्षक कला महोत्सवात हिंदी- मराठी गाण्यांची मैफल शिक्षकांनी चांगलीच जमवली होती; परंतु त्यात "या, या, या, बसा आमच्या शाळेत...' या गीताने सभागृहात एकच हशा पिकवला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार निर्मल घोष यांचे पुत्र तीर्थंकर घोष यांना अटक केली

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

Sudhagad Crime : सुधागड तालुक्यात चक्क पोलीस पाटलालाच लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT