temperature has come down in sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली का गारठलीय...?

सकाळ वृत्तसेवा

सांगली - सांगलीचा पारा गेल्या दोन दिवसात चांगलाच उतरला असून थंडीने सांगली गारठली आहे. आज सकाळी पारा 16 अंशांपर्यंत खाली उतरला होता. आणखी दोन-तीन दिवस थंडी अशीच राहण्याची शक्‍यता आहे. दुपारपर्यंत हवेत गारठा जाणवत होता. वास्तविक डिसेंबर महिन्यात जाणवणारा थंडीचा कडाका यंदा उशिरानेच दिसू लागला आहे.

दोन-तीन दिवस पारा उतरलेलाच राहणार

दोन दिवसांपुर्वीच कृष्णा नदीचे पात्र धुक्‍यात हरवले होते. त्यावेळी थंडी नव्हती. मात्र गुरुवारपासून पारा हळूहळू उतरु लागला. आज सकाळी नोंदवलेले तापमान 16 अंश होते. पहाटेपासूनचे बोचरी थंडी जाणवत होती. सकाळी थंडीचे प्रमाण चांगलेच वाढले. दुपारीही हवेत गारठा जाणवत होता. त्यामुळे सांगलीकर दुपारपर्यंत स्वेटर, मोजे, कानटोपी अशा गरम कपड्यातच वावरत होते.
गेल्या वर्षी पावसाळा नोव्हेंबरपर्यंत सुरु होता. डिसेंबरमध्येही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दणका दिला होता. त्यामुळे थंडीचा मोसम लांबणार याची अपेक्षा होतीच. त्याप्रमाणे निम्मा जानेवारी संपल्यावर थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे किती दिवस थंडीची हुडहुडी राहणार याचा नेमका अंदाज नसला तरी पुढील दोन-तीन दिवस पारा उतरलेलाच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT