Ten thousand bribe taken by ST depot manager; Action by police at in Kavthemahankal 
पश्चिम महाराष्ट्र

एसटी आगार व्यवस्थापकाने घेतली दहा हजारांची लाच; "लाचलुचपत'ची कवठेमहांकाळमध्ये कारवाई

शैलेश पेटकर

सांगली : दोन वर्षांऐवजी सहा महिने अल्प परिणामी वेतनवाढ रोखण्याचा अहवाल पाठवण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना कवठेमहांकाळ येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापकला रंगेहात पकडले. स्वप्नील लालासाहेब पाटील (वय 30) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने कवठेमहांकाळ एसटी आगारात खळबळ माजली आहे. 

लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, की कवठेमहांकाळ आगारातील एका कर्मचाऱ्याची सांगलीतील विभागीय कार्यालयात चौकशी सुरू होती. त्या चौकशीचा आगार व्यवस्थापक स्वप्नील पाटील हा संबंधित कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याबाबत अहवाल पाठवणार होता. संबंधित कर्मच्याऱ्याला पाटील याने बोलावून घेतले. "दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याचा अहवाल पाठवण्याऐवजी सहा महिने अल्प परिणामी वेतनवाढ रोखण्याचा अहवाल पाठवतो, असे सांगून दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाने याची माहिनी लाचलुचपत विभागाला दिली. त्यानुसार पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी सापळा रचून स्वप्नील पाटील याला कवठेमहांकाळ येथील शासकीय निवासस्थानात दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक प्रशांत चौगुले, अविनाश सागर, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, सलीम मकानदार, बाळासाहेब पवार, विना जाधव, राधिका माने, प्रीतम चौगुले यांच्या पथकाने ही करवाई केली. 

दक्षता सप्ताहात सापळा 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती दक्षता सप्ताह साजरा केला जात आहे. जिल्हाभर प्रबोधन आणि जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यातच वर्ग दोनचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. कवठेमहांकाळ परिसरात दिवसभर कारवाईची चर्चा सुरू होती. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT