Ten thousand doses of corona vaccine in the first phase in Sangli are useless 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत पहिल्या टप्प्यात कोरोना लसीचे दहा हजार डोस निरुपयोगी

अजित झळके

सांगली ः कोरोना लसीकरणाचे डोस वाया जाण्याच्या मुद्द्यावरून देशात व राज्यात राजकारण तापले आहे. महाराष्ट्राने खूप डोस वाया घालवले, असा आरोप केला जात आहे. अशावेळी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेताना येथे पहिल्या टप्प्यात लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक होते, असे चित्र समोर आले आहे. 2 लाख 59 हजार लोकांना डोस देताना सुमारे 10 हजार डोस निरुपयोगी ठरल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने "सकाळ'ला दिली. 


आता मात्र कोरोना लसीकरणाचे नियोजन अधिक काटेकोर केले जात असून लोकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाणही अत्यल्प होत आले आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये त्याबाबतचे धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल, असा सांगण्यात आले. सध्या ते 4 ते 5 टक्के इतके आहे. 


कोरोना लसीकरणासाठी 5 मिलीचे छोटी बाटली येते. एक डोस हा 0.5 मिलीचा आहे. म्हणजे, एक बाटली उघडल्यानंतर त्यातून दहा हजांना डोस देता येतो. एकदा एक बाटली उघडली की त्यानंतर पुढील चार तासांच्या आत हे डोस पूर्ण करावे लागतात. अन्यथा, हा डोस निरुपयोगी ठरतो. या वेळेत दिल्या न गेलेल्या डोसना ते वाया गेले, असे म्हटले जात आहे. वास्तविक, जिल्ह्यासारख्या ठिकाणी ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद होता. लोक घाबरत होते. मोजकेच लोक येत होते.

अशावेळी दहा लोक येण्याची वाट पाहणे कठीण झाले होते. परिणामी, लस घेण्यासाठी आलेले लोकही परत जाण्याची स्थिती होती. त्यामुळे त्यांना डोस दिले गेले. त्यातून काही डोस वाया गेले, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

दुर्गम भागात आव्हान 

जिल्ह्याच्या डोंगरी आणि दुष्काळी अशा दुर्गम भागात लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आव्हान आधीपासूनच आहे. पहिल्या टप्प्यात तर लसीकरणाला खूप कमी प्रतिसाद या भागातूनच होता. त्यामुळे डोस निरुपयोगी ठरण्याचे काहीसे अधिक प्रमाण होते. तेथे आता प्रबोधन, राजकीय लोकांचा पुढाकार आणि सर्व यंत्रणांकडून प्रयत्नामुळे लसीकरण वाढले आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT