terror of hen in kolhapur mazgaon 
पश्चिम महाराष्ट्र

अबब... तो लाल कोंबडा मुलांचा पाठलाग करतो आणि... 

सकाळ वृत्तसेवा

माजगाव (कोल्हापूर) : येथील सारणी गल्लीत चौगले वाड्यातील एका गावठी कोंबड्याने दहशत निर्माण केली आहे. हा कोंबडा लहान मुलांचा पाठलाग करून त्यांना चोच मारतो व पायांच्या नखाने ओरबाडून काढतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये घबराट पसरली असून, पालक या कोंबड्याच्या दहशतीमुळे चिंतेत आहेत. पालकांनी या कोंबड्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे. 

येथील चौगले वाड्यातील अरुण विलास चौगले यांना व त्यांच्या मुलगा आशुतोषला कुत्रा, मांजर, ससा आदी प्राणी पाळण्याची आवड आहे. तसेच त्यांना गावठी कोंबड्या पाळण्याचीही आवड आहे. सध्या त्यांचाकडे काही कोंबड्या आहेत. त्यामध्ये साधारण आठ महिने वयाचा लाल रंगाचा कोंबडा आहे. हा कोंबडा 5 ते 6 वयोगटातील मुलं-मुली दिसल्या की त्यांच्या मागे लागतो आणि त्यांना चोच मारतो पायाच्या नखाने ओरबडतो. यामुळे गल्लीत या कोंबड्याची दहशत निर्माण झाली आहे. मुले या कोंबड्याला घाबरतात. लांबूनच हा कोंबडा दिसला तर शाळेला जातांना मुले या गल्लीतून येत नाहीत. पालकांमध्येही या कोंबड्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. हा कोंबडा लहान मुलांच्याचं मागे का लागतो ? असे अरुण चौगले यांना विचारले असता, त्यांनी हा कोंबडा जेव्हा लहान पिलू होते त्यावेळी लहान मुलांनी या कोंबड्याला गंमतीने दगड मारून हुसकावले होते. यामुळे या कोंबड्याने लहान मुलांवर डूख धरला आहे. आता हा कोंबडा मोठा झाल्याने लहान मुलांच्या मागे लागून चोच मारतो व ओरबडतो. काही दिवसात याबाबत काहीतरी मार्ग काढू असे अरुण चौगले यांनी सांगितले.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

 Kolhapur Corporation : ‘शड्डू’ घुमला, ‘ताळ’ सुटला; नवीन नगरसेवकांवरच ज्येष्ठांना सांभाळून घेण्याची वेळ

Education News: VIT ची दमदार कामगिरी; २०२६ बॅचसाठी १० हजारांहून अधिक प्लेसमेंट ऑफर्स

Navi Mumbai: शेकडो व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : हडपसरमध्ये वॉचमनला मारहाण; दारूच्या नशेत दोघांचा हल्ला

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

SCROLL FOR NEXT