पश्चिम महाराष्ट्र

ही चाचणी...कोरोनासोबतच्या जगण्याची ! 

जयसिंग कुंभार

टाळेबंदी-3 च्या टप्प्यात केंद्र आणि राज्याच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने शहरात संचारबंदीसह अनेक बाबतीत ढील देण्याच्या दिशेने निर्णय केले आहेत. चाळीस दिवसाच्या काठेकोर संचारबंदीनंतर आज शहरात जाण आली. अशी ढील अपेक्षितच होती. आज ना उद्या ती द्यावीच लागणार होती. कारण शुन्य कोरोना असं जग काही लगेच असणार नाही. यापुढचे किमान वर्ष दिडवर्षाचे आपलं आयुष्य जगणे कोरोनापासूनच्या मृत्यूच्या भयासोबतचे असेल. त्यासाठीची पहिली चाचणी म्हणजे सध्याची टाळेबंदी-3.. आहे. या जगण्यात आता कोरोनाची टांगती तलवार असेलच सोबत आता यातून निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक समस्यांसोबतचा आपला सामनाही. 
 
सांगली महापालिका क्षेत्रातील मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्‍स आणि व्यापार पेठा बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा मोठा खल होऊन झाला. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाने 3 मे रोजी काढलेला सुधारित आदेशाचा अर्थ लावण्यात आयुक्तांसह अधिकाऱ्यांची टीम गुंतली होती. आता "वरून' आलेल्या आदेशाचे पालन क्रमप्राप्तच. मात्र आता त्याचे पालन करताना नागरिक व्यापारी यांची कसोटी लागणार आहे. अगदी सर्व प्रकारची एकल दुकाने सुरु राहतील असं या आदेशात म्हटलं आहे. याचा वेगवेगळा अर्थ घेतला जाऊ शकतो. अर्थात या अटी फार काळ चालणाऱ्या नाहीत. तेच दारु दुकानांबाबत दिसून आले. ही दुकाने सुरु करण्याचे आदेश राज्याचे मात्र त्याचे वेगवेगळे अर्थ जिल्ह्या जिल्ह्यात घेतले गेले. अगदी तालुक्‍या तालुक्‍यात आज सकाळपर्यंत वेगवेगळ्या बैठका सुरु होत्या. एकूण सर्व पातळ्यांवर संभ्रम अनिश्‍चितता होती. खरे तर यात बाऊ करावा असं काहीच नाही. मात्र टाळेबंदी लागू करताना दिल्लीपासून गल्लीपर्यंत झालेल्या चुकांचे दुष्परिणाम मात्र सर्वसामान्य नागरिक गेले चाळीस दिवस भोगतो आहे आणि पुढे त्याला भोगायचे आहे. 
यापुढचा काळ कठीण आहे. संकटकाळात माणसांनी आपलं अंगभूत शहाणपण कसोटीला लावून वर्तन करावे लागेल. विशेषतः आपल्या उत्सवप्रिय समाजाला यापुढच्या काळात अनेक बंधणांना सामोरे जावे लागेल. कोरोना संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार मात्र जगभरातील पाश्‍चात्य देशांप्रमाणे आपल्याकडे होत नसल्याचे गेल्या महिनाभरातील अनेक उदाहरणांमधून स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी तसा प्रसार होत नाही म्हणून आपण कसेही वागायला मोकळे होऊ शकत नाही. गर्दी टाळणे हाच कोरोना टाळण्याचा आजघडीचा मोठा उपाय आहे. भारतात गर्दी टाळणे म्हणजे हेच दिव्य आहे. प्रचंड लोकसंख्येच्या या देशात, माणसांनी ओसंडून जाणारी शहरांमध्ये गर्दी टाळून व्यवहार करायचे कसे हे बोलण्याइतके सोपे नाही. मात्र निदान शक्‍य तेवढे काही काळ ते करावेच लागेल. ओघानेच त्यासाठी शासन यंत्रणेकडून नियमांचा बडगा उगारला जाईल. लग्न, सण-समारंभ, सार्वजनिक धार्मिक उत्सवांवर बंधणे लादणार आहे. मग या जातीला, त्या धर्माला कशी परवानगी दिली यावरून युक्तीवाद रंगतील. यात राजकीय वशिलेबाजी रंगेल. मग त्यावरून प्रशासनासोबतचे खटके उडतील. हे सारे ओघानेच इथे होईल कारण आपण कोरोनाच्या आपत्तीलाही धर्माची लेबले लावण्यात कसूर ठेवली नाही. मग बऱ्याचदा लोकांना सरळ करण्यासाठी प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरु होऊ शकतो त्यातून अनेक प्रश्‍न-उपप्रश्‍न येतील. हे सारे आपल्याला सवयीचे आहेच ते अधिक करावे लागेल. 
यापुढे दुकाने-उद्योग यामध्ये सुरक्षित अंतर ठेवून वागायचे कसे? आणि त्यासाठी आपण त्या त्या ठिकाणी कोणत्या व्यवस्था उभ्या करणार हा यापुढे अधिक महत्वाचा मुद्दा असेल. महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या मागणीसाठी राईट टु पी हे आंदोलन करावे लागले. मग त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागते. अशा देशात पदोपदी हात धुण्यासाठी पाणी-सॅनिटायझेशच्या सुविधा उभ्या करण्याइतपतचे शहाणपण चाळीस पन्नास दिवसाच्या टाळेबंदीतून येईल असे माणणे म्हणजे अतिविश्‍वासच व्यक्त केल्यासारखे होईल. भर रस्त्यावर कार-दुचाकीवरून पिचकारी मारणे हा इथल्या उच्चशिक्षितांनाही (?) आपला जन्मसिध्द अधिकार वाटतो तिथे अशा अपेक्षा अवास्तवच. उद्योगांमध्ये कामगारांच्या आरोग्यांबाबत कमालीचे दुर्लक्ष करण्याची सवय अंगी पडलेल्या उद्योजकांना आता अशा सुविधा उभ्या करण्याचे शहाणपण येणार का, गर्दी टाळण्यासाठी कामाचे तास-पाळ्या यात कोणते बदल करणार, शाळा महाविद्यालये आज ना उद्या सुरु करावीच लागतील तेव्हाचे प्रश्‍न आणखी वेगळे असतील. असे अनेक डोंगराऐवढे प्रश्‍न आहेत. मुंबई-पुण्यासारख्याच नव्हे तर सांगलीसारख्या शहरातही सुरक्षित अंतर ठेवून रस्त्यावरील व्यवहार करणे ही पुस्तकी कल्पना आहे. मात्र संसर्ग रोखण्यासाठीच्या स्वच्छता-आरोग्याबाबतच्या अपेक्षा प्रत्यक्षात आल्या तर समाज बदलाची ही एक सुसंधीच म्हणावी लागेल. 
असो. यापुढे चाचण्यांची संख्या वाढेल तशी रुग्णसंख्याही वाढणार आहे. जागोजागी ठराविक परिसरात टाळेबंदीचे सत्र अटळ आहे. आता गावाकडे परतणारे कामगार आणखी आठ पंधरा दिवसानंतर पुन्हा शहरात परतणार आहेत. त्यानंतरचा गोंधळ पुन्हा नवा असेल. अशा काळात एखाद्याला, त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत करणारे वर्तन घडू नये. पुढचे वर्ष अशा गोंधळाचे असू शकते. त्यामुळे प्रशासनासह आपल्या सर्वांच्याच तारतम्यपुर्वक वर्तनाच्या कसोटीचे हे वर्ष असेल. त्याची पहिली चाचणी म्हणजे सध्याचे लॉकडाऊन-3 आहे. कोरोनाचा टीबी, डेंगी, स्वाईन फ्लु होईपर्यंत तरी ते हे संकट कायम आहे आणि बदलाची एक संधीही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT