zp schools sakal
पश्चिम महाराष्ट्र

झेडपीच्या ९५७ शाळांची वाढली पटसंख्या! ‘या’ शाळांमध्ये सुरु होणार सेमी इंग्रजी; गुणवत्ता वाढीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी बनविले शिक्षकांचे व्हॉट्‌सॲप ग्रूप

इंग्रजी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदांच्या मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पण, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील दोन हजार ७७५ शाळांपैकी ९५७ शाळांचा पट यंदा वाढला आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर भरोसा ठेवून पालकांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य दिल्याचे यातून दिसून येते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इंग्रजी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदांच्या मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पण, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील दोन हजार ७७५ शाळांपैकी ९५७ शाळांचा पट यंदा वाढला आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर भरोसा ठेवून पालकांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य दिल्याचे यातून दिसून येते.

केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त, शिक्षणाधिकाऱ्यांकडे कामाचे ओझे, यामुळे प्रत्येक शाळेला भेट देणे अधिकाऱ्यांना जमत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. काही शाळांमध्ये डमी शिक्षक काम करतात, शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीत, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नाहीत, अशा तक्रारी पालकांच्या आहेत. दुसरीकडे शेजारचा मुलगा इंग्रजी शाळेत जाऊ लागल्यापासून तो इंग्रजी बोलू लागला. पण, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आमच्या मुलाला इंग्रजी येत नाही, अशीही त्यांची खंत आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १५० हून अधिक शाळांची पटसंख्या १० ते २० पेक्षा देखील कमी आहे. अशा स्थितीत शिक्षकांनी पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले. पालकांना गुणवत्तेची हमी दिली, त्यांचा विश्वास संपादित केला. त्यातून ९५७ शाळांचा पट यंदा वाढला. जिल्हा परिषदेच्या ३२१ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु आहेत. ज्या शाळांनी व शाळा व्यवस्थापन समितीने मागणी केली, त्याठिकाणी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले जातात, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

  • एकूण शाळा

  • २७७५

  • पटसंख्या वाढलेल्या शाळा

  • ९५७

  • गतवर्षीची पटसंख्या

  • ५९,०३५

  • यंदा वाढलेली पटसंख्या

  • ६४,४३२

गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांचे व्हॉट्‌सॲप ग्रूप

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवत्ता वाढीसाठी आता तंत्रस्नेही शिक्षकांचे ग्रूप तयार करण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेची गुणवत्ता वाढेल, जेणेकरून पालक स्वत:हून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांचे विद्यार्थी पाठवतील.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सातवीतील ७० विद्यार्थी गेले, पण पहिलीत ४० जणच आले

ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पाचवी, सातवीपर्यंत शाळा आहेत, तेथील शेवटच्या वर्गातील ५०, ७० विद्यार्थी पुढच्या वर्गात गेल. पण, इयत्ता पहिलीसाठी त्या शाळांमध्ये २०, ३० मुलेच दाखल झाली. अशा स्थितीत ९५७ पैकी काही शाळांमधील शिक्षकांनी दुसरी, तिसरी, चौथीच्या वर्गातील विद्यार्थी वाढविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजपासून 'Under 19 Asia Cup' स्पर्धा, वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेच्या कामगिरीवर लक्ष; भारत-पाकिस्तान सामना कधी?

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्र गारठला! थंडीचा कहर, आणखी किती दिवस राहणार थंडी; काय सांगतो हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : ३० नागपुरात तापमान 10 अंशावर, ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या

Donald Trump : पाकिस्तानच्या ‘एफ-१६’ विमानांना अमेरिकेचे बळ

सूर्यमंदिराच्या गर्भगृहातील वाळू १२० वर्षांनी काढणार! कोणार्कमध्ये ऐतिहासिक प्रक्रिया सुरू; सुरक्षेसाठी ब्रिटिशकाळात केला होता उपाय

SCROLL FOR NEXT