drama competition.jpg
drama competition.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

नाट्यगृहांचा पडदा सात महिन्यानंतर उघडणार...प्रतिक्षा संपली : नाट्यकर्मी ते बॅकस्टेज कलाकारांकडून स्वागत 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाट्यगृहातील प्रयोगांवर पडदा टाकण्यात आला होता. साडेसात महिन्यापासून नाट्यगृहे बंद असल्यामुळे अनेक कलाकारांसह बॅकस्टेज कलाकारांवर आर्थिक अडचणींचे संकट ओढवले होते. तीच अवस्था नाट्यगृह मालकांची देखील आहे. केंद्र सरकारने नाट्यप्रयोगांना सशर्त परवानगी दिली असली तरी राज्य सरकारचा निर्णय प्रतिक्षेत होता. रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मावळत्या वर्षात किंवा नव्या वर्षाच्या प्रारंभी नाट्यप्रयोगाची घंटी वाजून पडदा उघडला जाईल अशी शक्‍यता आहे. 

कोरोनाच्या आपत्तीमध्ये लॉकडाउन जाहीर केल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमासह धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. 23 मार्चपासून अनेक गोष्टीवर बंधने घालण्यात आली. अनलॉकच्या प्रक्रियेत अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली. मात्र, अद्यापही नाट्य आणि चित्रपटगृहांना परवानगी दिली नाही. बार, जिम, इनडोअर खेळांसह अनेक गोष्टींना परवानगी राज्यातही मिळाली आहे. केंद्र सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेत नाट्यगृहे सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली. राज्य सरकारने अद्याप नाट्यप्रयोगाची घंटा वाजवलेली नाही. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी नाट्यगृह सुरू करण्याचे संकेत काही दिवसापूर्वी दिले होते. त्यामुळे नाट्यकर्मींसह या चळवळीतील सर्वांनाच नाट्यगृहे खुली होण्याची प्रतिक्षा लागून राहिली होती. आज रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला परवानगी दिल्यामुळे सर्वत्र स्वागत होत आहे. 

नाट्यगृहे बंद असली तरी गेले काही दिवस त्याची देखभाल दुरूस्ती सुरूच होती. साऊंड सिस्टीम व्यवस्थित ठेवणे, साफसफाई आदी गोष्टी कराव्याच लागत होत्या. तसेच नाट्यगृह बंद असले तरी किमान विजबिल आकारणी सुरूच आहे. महापालिका, नगरपालिका मालकीच्या नाट्यगृहांना फारसा फरक पडला नाही. परंतू इतर नाट्यगृह मालक, बॅकस्टेजचे कलाकार तसेच नाटकांवरच अवलंबून असलेले कलाकार यांना सात महिन्यात मोठा फटका बसला आहे. नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी भविष्यात त्यांच्यासमोर फारच अडचणी आहेत. 

सध्या निम्म्या प्रेक्षक क्षमतेनेच नाट्यगृहे चालवण्यास परवानगी दिली आहे. परंतू नाटकाचे प्रयोगासाठी संयोजकांना खर्चाचा ताळमेळ घालता येणार नाही. नाट्यगृहाचे भाडे, वाहतूक खर्च, कलाकारांचे मानधन, स्टेजवरील खर्च आदींचा विचार केल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नाशी ताळमेळ घालताना फार मोठी तफावत राहील. तसेच प्रेक्षकांची पावले नाटकाकडे वळवण्यासाठीही संयोजकांना कसरत करावी लागेल. तसेच नाट्यप्रयोगासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिक स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजना कराव्या लागतील. त्यामुळे नाट्यक्षेत्रापुढे पुढील काही दिवस अनेक अडचणी उभ्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली जाते. 


 

सध्या तत्काळ नाट्यप्रयोग शक्‍य नसले तरी व्याख्याने व इतर छोटे कार्यक्रम होऊ शकतात. त्यामुळे सर्वांसमोर एक सकारात्मक संदेश जाऊ शकतो. नाट्यगृह खुले करण्यास परवानगी देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. 
- मुकुंद पटवर्धन, नाट्यकर्मी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT