3snatcher.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला गेल्या अन्‌... 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कवठेपिरान (ता. मिरज) येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन ऐकत असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील बोरमाळ चोरट्याने हातोहात लंपास केली. 24 हजार रूपयांचे 46 मणी चोरीला गेले. आनंदाबाई श्रीपती यादव (वय 70) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कवठेपिरान (ता. मिरज) येथे हिंदकेसरी मारूती माने यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. 24) किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. किर्तनासाठी निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) होते. त्यामुळे कवठेपिरानसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. हायस्कूलसमोरील पटांगणात हा कार्यक्रम होता.

त्याठिकाणी आनंदाबाई यादव ही किर्तनासाठी गेल्या होत्या. पावणे नऊच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील बोरमाळ चोरट्याने कापून काढून चोरून नेली. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात शोधाशोध केली. त्यांना बोळमाळ मिळून आली नाही. अखेर त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फुल ड्रामा! तिसऱ्या अम्पायरने फलंदाजाला OUT दिले, सहकारी डग आऊडमध्ये 'आंदोलना'ला बसले; पुढे जे घडले त्याने सारेच चक्रावले

काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना ! पोटच्या मुलांनीच वृद्ध आई-वडिलांना जमिनीसाठी भररस्त्यात दांडक्याने केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ समोर

आजचे पंचांग २ सप्टेंबर २०२६! राहुकाळ, मुहूर्त, तिथी आणि नक्षत्र जाणून घ्या

“गणा धाव रे…” सनई चौघडे’च्या टीमचा कोकणात बाल्या डान्स; Viral Video

SCROLL FOR NEXT