"They 'made a gambling video to defame the police 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिसांच्या बदनामीसाठी "त्यांनी' बनवला जुगारअड्ड्याचा व्हिडिओ

शैलेश पेटकर

सांगली : त्या दोघांनी शहरातील एका ऑनलाईन जुगार अड्डयावरील व्हिडिओपट बनवला. त्यात चक्क पोलिसांना अठरा हजारांची दरमहा ऐंट्री देण्यापासूनचे संवादही टाकले आमि तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरवला. त्याची तत्काळ दखल घेत स्थानिक गुन्हा अन्वेशनचे पोलिस कर्मचारी अरुण शिवाजी औताडे यांनी दोघा अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. "पोलिसांप्रती समाजात अप्रितीची भावना' तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.


तंत्रज्ञानाच्या युगात आज पोलिसांसमोरील आव्हानांचे स्वरुप किती विविधरंगी आहे याचा दाखला देणारा हा प्रकार आहे. पोलिस हप्ते घेतात ही चर्चा होतच असते मात्र या दोघा पठ्ठ्यांनी मात्र तसा व्हिडिओच बनवला. अर्थात यातील पात्रे खरी की खोटी हे समजून येत नाही.

मात्र पोलिसांनी मात्र दलाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांप्रती अप्रितीची भावना चेतावल्याप्रकरणी अधिनियम 1922 व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयिताने साथीदारासह ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या जुगाराचे व्हिडिओ शुटिंग करतो.

तो स्वतः हजार रूपये जुगारात लावतो. तो स्वतः जुगाराबाबत माहितीही देतो. त्यात पोलिस दलाकडून या अड्डयाला प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगतो. दुकानदाराकडून 18 हजारांची ऐंट्री जात असल्याचा आरोप चित्रित केला आहे. 


दोन दिवसांपासून हा व्हिडिओ शहरात व्हायरल झाल्यानंतर काल पोलिसांनी त्या दोघा "चित्रतपस्वी' अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

Aquarius success astrology: कुंभ राशीवाल्यांनी 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा! वर्षभर अपघात टळतील अन् यशाची दारं उघडतील

Sports Tournament in 2026: क्रिकेट ते फुटबॉल वर्ल्ड कप... २०२६ मध्ये क्रीडा स्पर्धांची सर्वात मोठी पर्वणी; 'या' तारखा नोट करून ठेवा

आता गणिताची कोडी सोडवणार अयोध्येचे 'राम मंदिर'; उत्तर प्रदेशातील इयत्ता चौथीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT