They should implement that pattern 
पश्चिम महाराष्ट्र

त्यांनी तो पॅटर्न राबवावा 

सकाळ वृत्तसेवा

नगर : "विखे पाटील कॉंग्रेसमध्ये असताना, यापूर्वीच्या एका निवडणुकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सत्यजित तांबे यांना द्यावे, असा आदेश कॉंग्रेसने दिला होता. तो आदेश डावलून विखे पाटील यांनी अध्यक्षपद आपल्याकडे घेतले होते. त्या वेळी त्यांनी इतर पक्षांमधील सदस्य आपल्या बाजूला वळवून मतदान घडवून आणले होते. "तसाच पॅटर्न' आता या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी राबवावा,'' असा टोला शिवाजी कर्डिले यांनी विखे पाटील यांना लगावला. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड येत्या 31 तारखेस होणार आहे. यामध्ये भाजपचे केवळ 13 सदस्य आहेत. असे असतानाही भाजप या निवडणुकीत उतरणार आहे. विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील सध्या कॉंग्रेसमध्येच असून, त्या कॉंग्रेसच्या उमेदवार असतील, तर भाजपचे सदस्य मदत करणार नाहीत, अशी भूमिका इतर नेत्यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्डिले यांनी या निवडणुकीत भाजपचे सदस्य केवळ कमळ चिन्हावर निवडून आलेल्यांनाच मदत करतील, असे सांगत भूमिका स्पष्ट केली. 

अध्यक्ष निवडीच्या घडामोडींबाबत कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व अधिकार विखे पाटील व माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे भाजपचाच उमेदवार उभा करून निवडून आणून दाखवावा, असे अप्रत्यक्ष आव्हानच कर्डिले यांनी दिल्याचे मानले जाते आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT