gold recovery dhalgaon.jpg
gold recovery dhalgaon.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आश्‍चर्यच...22 लाखाचे सोने चोरट्याने परत आणून ठेवले...चोरटा कोण? याचे गुढ कायम 

सकाळवृत्तसेवा

ढालगाव (सांगली)- कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील विलास हिंदूराव कदम यांचे बंद घर फोडून तब्बल 48 तोळे सोन्यावर डल्ला मारण्यात आला होता. 10 जूनला हा प्रकार घडला होता. मात्र चोरट्याने चोरीचे 22 लाखाचे दागिने श्री. कदम यांच्या झोपडीत ठेवून पलायन केले होते. सोमवारी ते सापडले. त्यामुळे या प्रकाराबद्दल परिसरात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोर लवकरच सापडेल असे म्हटले होते...त्यामुळे पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सोने परत आणून ठेवल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. तरीही चोरटा कोण? याचे गुढ कायम असून नागरिकांना तपासाची उत्सुकता लागली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कदमवाडी येथे विलास कदम व त्यांची पत्नी दोघे राहण्यास आहेत. त्यांची मुले मुंबई येथे नोकरीस आहेत. 17 मे रोजी त्यांचा एक मुलगा व सून घरी आले होते. त्यांच्यातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे घरातील व संपर्कातील 22 जणांना चार जूनपासून कवठेमहांकाळ येथे संस्थात्मक "क्वारंटाईन' करण्यात आल्याने घरी कोणीही नव्हते. गावात त्यांच्या घराजवळ चार जूनपासून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला होता. तरीही घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी 10 जूनला घरातील सर्व साहित्य विस्कटून जवळ जवळ 48 तोळे सोन्यावर डल्ला मारला. बाजार भावाप्रमाणे सोन्याची किंमत बावीस लाख रूपये होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात याची नोंद झाली होती. 
दरम्यान सोमवारी सकाळी युवराज कदम व यशवंत कदम हे दोघे जनावरे चरवण्यासाठी विलास कदम यांच्या शेताजवळ गेले होते. शेतात निवाऱ्यासाठी केलेल्या झोपडीत त्यांना पिशवी व गाठोडं दिसले. त्यांनी उघडून पाहिले असता त्यात सोन्याचे दागिने दिसले. त्यांनी विलास यांच्या जवळचे नातेवाईक सतिश कदम यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल कोळंबीकर व "एलसीबी' चे पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन झोपडीत सापडलेल्या सोन्याचा पंचांसमक्ष पंचनामा केला. कदमवाडीतच सोनाराला बोलावून सोन्याच्या दागिण्यांचे वजन करण्यात आले. 

पोलिसांचा नामी इशारा...अन चोरट्याची शरणागती- 
सोने चोरीस गेल्यानंतर पोलिसांनी तपास करताना गावात सर्वांच्या समक्ष चोरटा लवकरच सापडेल. आमच्याकडे काही माहिती मिळाली असल्याचे सांगितले. पोलिसांनी असा इशारा दिल्यानंतर तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोलिसांच्या एका इशाऱ्यावरच चोरट्यांनी दागिने विलास कदम यांच्या छपरात आणुन ठेवले असल्याची माहिती पुढे येत आहे. दागिने जरी मिळाले असले तरी चोर कोण ? याबद्दलचे गूढ वाढले आहे. सोने मिळाले तरी पोलिसांचा तपास सुरूच राहणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT