Third Gender came to the municipal door 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : तृतीय पंथीय म्हणाले, नाही तर साडीच फेडू... महापालिकेला वसुलीची सुपारी अंगलट

सकाळ वृत्तसेवा

नगर ः महापालिकेची नगरकरांकडे मोठी थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही ती भरली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर परिणाम होत आहे. थकबाकी लाखाच्या घरात गेली आहे. त्या वसुलीसाठी महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे. तृतीयपंथीय, बँड पथक, हलगीवाले यांच्या मदतीने ही वसुली करण्याचा महापालिकेचा बेत होता.

ही वसुलीची आयडिया महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली आहे. तृतीय पंथीयांना विश्वासात न घेताच महापालिकेने निर्णय घेतला. त्यामुळे ते  चिडले आणि थकबाकीदारांच्या दारात जाण्याऐवजी महापालिकेच्याच दारात गेले.

आम्हाला न विचारता तुम्ही परस्पर हा निर्णय घेतलाच कसा, आम्हाला रहायला घरं नाही, साधे रेशन कार्डही निघत नाही. आमच्या जगण्याचा प्रश्न आहे. परंतु महापालिकेने कधी सहानुभूतीने त्याकडे पाहिलं का... आता तु्म्हाला गरज पडली म्हणून तुम्ही आम्हाला सुपारी द्यायला निघालेत का, असा सवाल तृतीय पंथीयांची गुरू काजल यांनी महापालिका प्रशासनाला केला.

आम्ही लोकांच्या दारात तुमच्या वसुलीसाठी जाणार नाही. आम्ही चार घरं मागून जगतो. आता आम्ही प्रेमाने सांगायला आलो आहोत. या पुढे असं केलं तर महापालिकेच्या दारात साडी फेडून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

तृतीयपंथयींच्या या भूमिकेमुळे महापालिका प्रशासन नागडे झाले आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या प्रसिद्धी विभागाने थकबाकी वसुलीसाठी संबंधितांच्या घरासमोर ढोलताशा वाजवला जाईल. तसेच तृतीय पंथीयांनाही टाळी वाजवायला लावली जाईल, असे पत्रक काढलं होतं. ते आता अंगलट आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकरणात सपशेल दिलगिरी व्यक्त केली आहे. या पुढे असा प्रकार होणार नाही. प्रसिद्धी विभागास तसे कळवले जाईल, अशी शब्दांत महापालिकेचे उपायुक्त (कर) सुनील पवार त्यांची समजूत घातली. तेव्हा कुठे तृतीयपंथीय शांत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्याय राहुदे पण अन्याय तरी करू नका, आंदेकरांना तिकीट दिलंत तर..., बंडू आंदेकरांच्या लेकीचा सर्वपक्षीयांना इशारा

Prakash Ambedkar: घाणीत राहायचे की विकास हवा, हे नागरिकांनी ठरवावे : प्रकाश आंबेडकर, वंचितच्या हाती सत्ता द्या!

Viral Video : भाड्याचं नाही, तुमचं घर आहे! लेकानं आई-वडिलांना सरप्राइज, किल्ली हाती देताच डोळ्यात आलं पाणी; भावूक करणारा व्हिडीओ

Post Office FD : बँक नाही, तर पोस्ट ऑफिसची FD ठरतेय फायद्याची; रेपो दराच्या कपातीनंतरही देते 7.5% पर्यंत व्याज

Vijay Hazare Trophy Schedule: रोहित शर्मा, विराट कोहली यांना खेळताना Live कुठे पाहता येणार? समोर आलं वेळापत्रक

SCROLL FOR NEXT