Student Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : प्रथम वर्ष सुरु करण्यास तिसऱ्यांदा आदेश

आरसीयुचा कारभार ,अभ्यासक्रमही वेबसाईटवर नाहीच, विद्यार्थ्यांतून नाराजी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठा अंतर्गत (आरसीयु) येणाऱ्या पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील वर्गांना सोमवारपासून (ता.४) सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या वर्षातील वर्गांना गुरुवारपासून (ता.७) सुरुवात होणार आहे. प्रथम वर्षातील वर्गासंबंधी विद्यापीठाने तिसऱ्यांदा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे तरी पालन व्यवस्‍थित होणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

यंदा कोरोनामुळे पदवी महाविद्यालयांच्या परीक्षा उशीरा झाल्या आहेत. तसेच पुढील वर्गांना देखील उशीरा सुरुवात झाली आहे. दरवर्षी जुलैमध्ये महाविद्यालये सुरु होतात. यंदा मात्र, कोरोनामुळे पदवी महाविद्यालये सुरु होण्यास ऑक्टोबर महिना उजाडला.

विद्यापीठाने २२ सप्टेंबर रोजी एक आदेश काढून पदवी महाविद्यालयांची वर्षभराची रुपरेषा जाहीर केली होती. यामध्ये पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाला ४ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या रुपरेषेनुसार फक्त पदवीचे द्वितीय व तृतीय वर्षातील वर्गांना सुरुवात झाली आहे. विद्यापीठाने पुन्हा ४ सप्टेंबररोजी एक आदेश काढून पदवीच्या ऑफलाईन वर्गांना ५ पासून सुरुवात होईल असे म्हटले. तसेच ५ रोजी पुन्हा एक आदेश काढून पदवीचे प्रथम वर्षातील वर्ग ७ पासून सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. यंदा राष्ट्रीय शिक्षण नितीला सुरुवात झाली आहे. पदवीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांपासून या नितीची सुरुवात झाली आहे. त्यांच्या वर्गांनाही आता ७ पासून सुरुवात होणार आहे. अजून अभ्यासक्रम नाहीच

पदवीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण नितीतील अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. मात्र, हा अभ्यासक्रम अध्यापही वेबसाईटवर सोडण्यात आला नाही. ७ पासून प्रथम वर्षातील वर्ग सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांना काय शिकवावे असा प्रश्‍न प्राध्यापकांसमोर आहे. यामुळे लवकरच अभ्यासक्रम वेबसाईटवर अपलोड करावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT