"Thirty-first district council president." 
पश्चिम महाराष्ट्र

"थर्टी फर्स्ट'ला जिल्हा परिषदेत नवा अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. ही निवडणूक येत्या 31 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीतून जिल्हा परिषदेला नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष मिळणार आहेत. या संदर्भात उद्या (ता. 21) नोटीस जारी होणार आहे. 


अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 
या निवडणुकीत उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेचे स्थान महत्त्वपूर्ण मानले जाते. पंचायतराज व्यवस्थेत महत्त्वाची संस्था म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे पाटील व उपाध्यक्ष राजश्री घुले यांची पहिली टर्म संपली आहे. 

पुढील टर्मसाठी ग्रामविकास विभागाने सोडतीद्वारे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. त्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निघाले. 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निगराणीत अध्यक्ष- उपाध्यक्षांची निवडणूकप्रक्रिया जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे. 

दरम्यान निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून शालिनी विखे पाटील यांच्याकडे पदभार राहणार आहे. या कार्यकाळात धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. 

असा आहे 31 डिसेंबरचा कार्यक्रम 

अर्ज दाखल करण्याची मुदत ः सकाळी 11 ते दुपारी 1 
छाननी, माघार आवश्‍यकता असल्यास निवडणूक ः दुपारी 3 

नववर्षात सभापतींच्या निवडी 

नवीवर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींची व समित्यांच्या निवडी नवीन वर्षात होणार आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nice Dp! पत्नीला मित्राचा मेसेज आला अन् पतीने गळा आवळून जीवघेणा हल्ला केला; धक्कादायक घटना समोर...

Solapur Accident: देवदर्शन अन् काळाचा घाला ! 'बल्करच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार'; अक्कलकोट रोडवरील घटना..

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल, हिंगणा पोलिसांची कारवाई

Bribery Action:'बिल काढण्यासाठी लाच मागणारा विस्ताराधिकारी जाळ्यात'; साेलापुरात खळबळ, दोन हजार घेताना सापडला..

Sasapde Murder Case: धक्कादायक! 'सासपडे येथील नराधमाकडून आणखी एका खुनाची कबुली'; सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

SCROLL FOR NEXT