बेळगाव वाहन तपासणी
बेळगाव वाहन तपासणी Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव शहरात पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - हेल्मेट, वाहन परवाना, विमा आदी सर्व कागदपत्रे सादर केली तरी बेळगाव वाहतूक पोलिस वाहनचालकांना सहजासहजी सोडणार नाहीत. नंबर प्लेट, धूर तपासणी किंवा इतर कारणावरूनही दंडाची पावती वाहनचालकांच्या हाती टेकवली जात आहे. त्यातच पोलिसांनी आडमार्गावर थांबून वाहने अडविण्यास सुरुवात केल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली असून बाजारपेठेतही मोठी गर्दी होत आहे. खरेदी व विविध कामांसाठी बाजारपेठेत येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असून सर्वत्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे; पण वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बाजारपेठेत वाहतूक पोलिसच नसल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक पोलिस केवळ शहरातील मोक्याच्या ठिकाणी तसेच आडमार्गावर थांबून वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठेत रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाहनचालकही वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. जागा मिळेल तिथे वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. परिणामी, ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. मात्र, याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करत केवळ दंडात्मक कारवाई करण्यावरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे वाहनचालकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT