"Those 'cases will be investigated 
पश्चिम महाराष्ट्र

"त्या' प्रकरणाची चौकशी होणार  

सकाळ वृत्तसेवा

नगर : अकोल्यातील सुमारे आठ ग्रामपंचायतींमधील गैरकारभाराची चौकशी व्हावी, तसेच गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले. प्रशासनातर्फे दहा दिवसांत चौकशीच्या लेखी आश्‍वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. 

अकोल्याचे गटविकास अधिकारी बी. एस. रेंगडे यांचा मनमानी कारभार सुरू आहे. तसेच, तालुक्‍यातील सुमारे आठ ग्रामपंचायतींमध्ये गैरप्रकार झाला आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी करावी, अशा मागणीसाठी दराडे यांनी हे उपोषण सुरू केले होते.

अांदाेलकांची नावे 

आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे, सरपंच बाळासाहेब मालुंजकर, राम एखंडे, बाळासाहेब केदार, अशोक एखंडे, बाबासाहेब एखंडे, नजीर शेख, प्रभाकर एखंडे, गणेश एखंडे, नारायण उगले, मीरा दराडे आदी सहभागी झाले होते. 

दहा दिवसात चाैकशीचे लेखी अाश्वासन

या उपोषणामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याविषयी चर्चा केली. पहिली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर दुसऱ्यांदा चर्चा केली. ती सफल झाली. चर्चेत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले यांची शिष्टाई महत्त्वपूर्ण ठरली. दराडे यांनी केलेल्या मागण्यांची दहा दिवसांत चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन त्यांना देण्यात आले. त्यानंतर उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते दराडे यांना लिंबूपाणी देण्यात आले.

हे हाेते उपस्थित

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निखिल ओसवाल, सभापती उमेश परहर, सभापती रामदास भोर, परमवीर पांडुळे आदी उपस्थित होते. 

अशी होणार चौकशी 
दराडे यांच्या तक्रारी व उपोषणामुळे प्रशासनाने सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची दोन पथके करून दहा दिवसांत चौकशी करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video

Amravati Crime : डोक्यावर गोळी झाडून क्यूआरटी जवानाची आत्महत्या; पोलिस आयुक्तालयाच्या बेसमेंटमधील घटनेमुळे खळबळ

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Nagpur News : महिलेच्या पोटातून काढला १३ किलो वजनाचा फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर

SCROLL FOR NEXT