पश्चिम महाराष्ट्र

माजी आमदाराकडून संचालकाला जीवे मारण्याची धमकी 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक यु.आर. दळवी यांच्याकडे प्रभारी सचिवपद दिल्याच्या कारणावरून बाजार समितीच्या बैठकीत दोन संचालकांमध्ये वादावादी झाली. संचालक तथा माजी आमदार दिलीप माने यांनी संचालक श्रीमंत बंडगर यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : झेडपी अध्यक्षपदामुळे मोहितेंचे समाधान? 

संचालक बंडगर हे सुभाष देशमुख यांचे समर्थक

तज्ञ संचालक श्रीमंत नारायण बंडगर (रा. पाथरी ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने हे माजी सभापती व संचालक आहेत. संचालक बंडगर हे माजी सहकार मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक आहेत. सध्या आमदार विजयकुमार देशमुख हे बाजार समितीचे सभापती आहेत. 

हेही वाचा : सोलापूर राष्ट्रवादीत नेते आहेत, नेतृत्व नाही

शिवीगाळ, दमदाटी केल्याचा आरोप 
गुरुवारी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची बैठक होती. या बैठकीत संचालक श्रीमंत बंडगर यांनी कनिष्ठ लिपिक यु.आर. दळवी यांच्याकडे बाजार समितीचे प्रभारी पद का दिले याची विचारणा केली. या कारणावरून माने आणि बंडगर यांच्या वाद झाला. दळवी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तरीसुद्धा त्यांच्याकडे पदभार दिला असे संचालक बंडगर यांचे म्हणणे आहे. याबाबत अशी विचारणा केल्यानंतर माने यांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याचे तसेच पुठ्ठ्याच्या पॅडने मारल्याचे संचालक बंडगर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक देविदास कारंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT