Three arrested in Sarpanch murder case 
पश्चिम महाराष्ट्र

सरपंचाच्या खुनाच्या गुन्ह्यात तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नगर : दैत्यनांदूर (ता. पाथर्डी) येथील सरपंच संजय दहिफळे यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. 


ज्ञानेश्‍वर विष्णू दहिफळे (वय 28), राहुल शहादेव दहिफळे (वय 22), भागवत हरिभाऊ नागरगोजे (वय 50, रा. दैत्यनांदूर, ता. पाथर्डी), अशी आरोपींची नावे आहेत. निवडणुकीच्या कारणावरून दैत्यनांदूर येथे दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. त्यात शहादेव दहिफळे यांनी सरपंच संजय दहिफळे यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात सरपंच दहिफळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश रमेश दहिफळे यांच्या फिर्यादीवरून सेवानिवृत्त सैनिक शहादेव दहिफळे यांच्यासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

गुन्ह्यातील वरील तीन आरोपी पाथर्डी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने आज वरील तीन आरोपींना अटक करून पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय वेठेकर, रवींद्र कर्डिले, मन्सूर सय्यद, अण्णा पवार, संदीप घोडके, रोहित मिसाळ, कमलेश पाथरूट यांच्या पथकाने केली. 

चंदनचोरीच्या गुन्ह्यात दोघे गजाआड 

जामखेड रस्त्यावर निंबोडी गावाच्या शिवारात विनाक्रमांकाची मोटर भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतली असता, तीमधून दोन किलो चंदन व तीन मोबाईल जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बंडू अशोक बोंद्रे (वय 27, रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी, जि. बीड), तेजस महादेव मुठे (रा. कुंभेफळ, ता. आष्टी), अशी आरोपींची नावे आहेत. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी माहिती मिळाली, की मोटारीमधून दोन व्यक्ती चंदन घेऊन जात आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने काल रात्री नगर-जामखेड रस्त्यावरील निंबोडी गावाच्या शिवारात सापळा लावून विनाक्रमांकाची मोटर अडविली. झडती घेतली असता तीत दोन किलो चंदन आढळून आले. पोलिसांनी चंदन, तीन मोबाईल जप्त करून वरील आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक फौजदार राजेंद्र मुळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय नगरे, पोलिस नाईक जालिंदर आव्हाड, राजेंद्र सुद्रिक यांच्या पथकाने केली. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्व आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT