District 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव जिल्ह्यात तीन दिवस ‘विकेंड’ लॉकडाउन

शुक्रवार ते रविवारपर्यंत बंद; बेळगाव जिल्हाधिकारी

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘विकेंड’ला तीन दिवस पूर्ण लॉकडाउनची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांनी मंगळवारी (ता.१) केली आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या व बळी लक्षात घेऊन शुक्रवारी (ता.४) सकाळी ६ ते सोमवारी (ता.७) सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडॉऊनचा कालावधीत जाहीर केला आहे.

यापूर्वी शनिवार, रविवार असे २ दिवस विकेंड लॉकडाऊन असायचे. पण, यावेळी तीन दिवस विकेंड लॉकडाउन घोषित केले आहे. यामुळे शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस कडकडीत लॉकडाउन असेल. या दरम्यान विनाकारण घराबाहेर पडणे, वाहन चालविणे यांच्यावर कारवाई केली जाईल. शिवाय सकाळी सहा ते दहा यावेळेत देण्यात आलेली शिथिलता रद्द केली जाईल. केवळ अत्यावश्‍क सेवा सुरु राहतील. यात रेशन दुकाने, दूध विक्री आणि मेडिकलसारख्या सेवांचा समावेश आहे. उर्वरित सेवा वगळल्या आहेत.

जिल्ह्यात यापूर्वी दोनवेळा विकेंड लॉकडॉउन जाहीर झाले होते. येत्या शुक्रवारपासून तिसरे विकेंड लॉकडाऊन असेल. पण, या दरम्यान रुग्णालय, अत्यावश्‍यक वस्तूंची खरेदी, दूध पुरवठा किंवा खरेदीला निर्बंध असणार नाही. ऑनलाईन आहार सेवा, सरकारी कर्मचारी सरकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहणे, रेशन वाहतूक किंवा वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण, ही सेवा सकाळी सहा ते दहा यावेळेतच पुरवली जाईल. रयत संपर्क केंद्रातून कृषी बियाणे, खत वितरणासाठी सकाळी ६ ते दुपारी १२ यावेळेत मुभा असेल. लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण, त्यासाठी अगोदर परवानगी घेतलेली असावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास दंडसंहिता १८८ अन्वये कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जाण्यासाठी पुणेकरांना नवा वेगवान मार्ग; १३४ किमीच्या चौपदरी महामार्गाला मंजुरी; कोणत्या प्रवाशांना फायदा?

Monsoon Update: आनंदाची बातमी! मॉन्सून अंदमानात दाखल; बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेटे, अरबी समुद्रात हजेरी, केरळात २६ मेपर्यंत धडकणार..

मिचेल स्टार्क विरुद्ध वैभव सूर्यवंशी यांच्यात रंगणार हायव्होल्टेज ड्रामा, राजस्थान रॉयल्सला प्लेऑफची मोठी संधी, RR साठी करो अथवा मरो

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

Ranbir Kapoor: रामायण सिनेमाच्या आधी रणबीर कपूरचा अयोध्येत मोठा डाव! ३.३१ कोटींना खरेदी केला शरयू किनाऱ्यावरील प्लॉट

SCROLL FOR NEXT