congress logo
congress logo 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर झेडपीतील कॉंग्रेसचे तीन सदस्य अपात्रतेच्या वाटेवर... 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झालेला पराभव हा वरिष्ठ नेत्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि बंडखोरांना त्यांची जागा दाखविण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस सरसावली आहे. राष्ट्रवादीने सहा बंडखोरांना अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर आता कॉंग्रेसनेही तीन बंडखोरांना नोटीस बजावली आहे. या नऊ सदस्यांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी उद्या (गुरुवार) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले घेणार आहेत. 9 रोजी सुनावणी आणि 14 जानेवारीला विषय समिती सभापतींच्या निवडी असल्याने सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. 
हेही वाचा : अखेर "त्या' यादीला ब्रेक; महाविकास आघाडीला पहिला दणका 
जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील आणि सदस्या शिलंवती भासगी यांनी व्हिप डावलल्या प्रकरणी कॉंग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे धाव घेतली आहे. अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील हे मंगरूळ जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. 2017 च्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत पाटील यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपण कॉंग्रेससोबत असल्याचे लिहून दिले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना व्हिप बजावला आहे आणि आता व्हिप मोडला म्हणून नोटीस बजावली आहे. पाटील यांनी लिहून दिलेले प्रतिज्ञापत्रच त्यांच्यासाठी घातक ठरण्याची शक्‍यता आहे. 
हेही वाचा : भारत बंदला सोलापुरात अल्प प्रतिसाद 
राष्ट्रवादीचे बंडखोर सदस्य अरुण तोडकर, गणेश पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलादेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले आणि मंगल वाघमोडे हे सहा जण आणि कॉंग्रेसचे तीन बंडखोर सदस्य शिवानंद पाटील, मल्लिकार्जुन पाटील आणि शिलवंती भासगी यांच्या सदस्यत्वाबाबत उद्या (गुरुवार) दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सुनावणी होणार आहे. संधी असूनही अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. किमान विषय समित्यांच्या सभापती निवडीत तरी आपल्या माणसांना संधी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी तयारीला लागले आहेत. 
भाजपच्या खेळीकडे लक्ष... 
मोहिते-पाटील गटाचे बंडखोर सदस्य, माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे सदस्य, सभापती विजयराज डोंगरे यांच्या गटाचे सदस्य आणि संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या गटाचे सदस्य यांना सोबत घेऊन भाजपने अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीत राजकीय चमत्कार घडविला आहे. 14 जानेवारीला होणाऱ्या विषय समिती सभापती निवडीत या गटाची काय खेळी असणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती पदाच्या निवडी चुरशीच्या होण्याची शक्‍यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT