Thrilling ... "Most Wanted 'Bally arrested 
पश्चिम महाराष्ट्र

video : थरारक... "मोस्ट वॉंटेड' बल्ली गजाआड 

विलास कुलकर्णी

राहुरी : तेरा वर्षांपासून धुमाकूळ घालणारा, गुन्हेगारी टोळ्यांचा म्होरक्‍या बल्ली ऊर्फ बाबासाहेब भाऊसाहेब साळवे (वय 28, रा. शिंगवे नाईक, ता. नगर) याला राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या पथकाने काल (शनिवारी) रात्री साडेअकरा वाजता दुर्गम शेरी-चिखलठाण शिवारातील जंगलात पाठलाग करून शिताफीने पकडले. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महामार्गावर रस्तालूट, घरफोड्या, जबरी चोऱ्या, दरोडे, खून, अशा चोवीस गुन्ह्यांमध्ये तो "मोस्ट वॉंटेड' आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही त्याने अनेक गुन्हे केल्याची माहिती श्रीरामपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी दिली.

राहुरी येथे पत्रकार परिषदेत आज डॉ. काळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ""धष्टपुष्ट शरीरयष्टीचा आरोपी बल्ली साळवे कुख्यात गुन्हेगार आहे. दुर्गम जंगलात तो लपून राहायचा. त्याचे तेरा-चौदा साथीदार आहेत. त्यांच्या टोळ्या तयार करून तो गुन्हे करत होता. त्याचे बहुतांश साथीदार सध्या राहुरी पोलिस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत आहेत. राहुरी (तेरा), नगर एमआयडीसी (सहा), पारनेर, लोणी, कोतवाली- नगर व कोपरगाव (प्रत्येकी एक) पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण चोवीस गुन्ह्यांमध्ये तो "मोस्ट वॉंटेड' आहे. 
नेवासे, सोनई, शिंगणापूर, शिर्डी व औरंगाबाद जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्येही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत; त्यांचीही माहिती घेत आहोत, असेही काळे यांनी सांगितले. 

पथकाला पारितोषिक देणार! 
""नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक शेरिंग दोरजे यांनी फरार आरोपी पकडण्यासाठी मंगळवारपासून (ता. 24) विशेष मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत ही कारवाई केली. कारवाईत भाग घेतलेले पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलिस नाईक सोमनाथ जायभाय, प्रवीण खंडागळे, कॉन्स्टेबल आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे यांच्या पथकाला विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल,'' असेही डॉ. काळे यांनी सांगितले. 

येथे क्‍लिक करा आलीस तू... फुलले ऋतू... 

असा पकडला आरोपी... 
पोलिस निरीक्षक देशमुख म्हणाले, ""रात्री आठ वाजता म्हैसगाव परिसरात सापळा लावला होता. कडाक्‍याच्या थंडीत अकरा वाजता वेश पालटून आरोपी बल्ली साळवे दुचाकीवरून भरधाव जाताना दिसला. दोन दुचाकींवरून त्याचा पाठलाग केला. एक किलोमीटर पाठलाग केल्यावर त्याला संशय आला. दुचाकी सोडून जंगलाच्या दिशेने त्याने अंधारात पळ काढला. गोळीबार करण्याचा इशारा दिल्यावर तो अडखळला व खाली पडला. पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कमरेला धारदार चाकू आढळला.'' 

पोलिस कोठडीत रवानगी... 
डिग्रस फाटा येथे महामार्गावर वाहने लुटण्यासाठी दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीवर पोलिसांनी झडप घातली होती. त्यात महेश निमसे (वय 24, रा. टाकळीमियॉं) या आरोपीस पकडले होते. त्याने पाच साथीदारांची नावे सांगितली. नंतर त्यांतील चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात टोळीचा म्होरक्‍या बल्ली साळवे यास राहुरी न्यायालयाने आज तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT