Timanthi Awale Sangli Police Force esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Police : शेततळ्यात बुडून सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा दुर्देवी अंत

रात्री उशिरा त्यांचा मृतदेह सापडला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ डिजिटल टीम

गृहरक्षक दलातील उमेदवारांची चालक पदाची चाचणी भोसे येथील विश्वेश्वरैय्या महाविद्यालय परिसरात होणार होती.

मिरज : सोनी (ता. मिरज) येथे सांगली पोलिस दलातील यांत्रिकी विभागात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक तिमंथी ऊर्फ बाळ दयानंद आवळे (वय ५६) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी, की सांगली पोलिस दलाकडील (Sangli Police Force) परिवहन विभागात गृहरक्षक दलातील उमेदवारांची चालक पदाची चाचणी भोसे येथील विश्वेश्वरैय्या महाविद्यालय परिसरात होणार होती. परिवहन विभागाकडील अधिकाऱ्यांसह दहा-पंधरा कर्मचारी गेले होते.

दोनशे उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. चाचणीनंतर आवळेंसह दहा-बारा सहकारी शेततळ्याशेजारी जेवणास गेले. आवळे व एक सहकारी पोहण्यास गेले. तिमंथी आवळे अचानक पाण्यात बुडाले. सहकाऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह सापडला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT