time table of rani channamma university changes movement of transportation in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, संप सुरू असल्याने निर्णय

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयू) पदवी, पदव्युत्तर आणि एमबीए परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. यापूर्वी ७ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत होणाऱ्या विविध विषयांचे पेपर १९ एप्रिलपासून ४ मे पर्यंत होणार आहेत. यासंबंधी पत्रक काढून विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना कळविले आहे. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्याने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

परिवहन कर्मचारी ७ एप्रिलपासून संपावर आहेत. त्यामुळे आरसीयूने ७ ते ९ एप्रिलपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती यापूर्वीच दिली होती. मात्र, गुरुवारी (९) पुन्हा परीक्षा 
तारखेमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली. यासंबंधी स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सूचनाही केल्या आहेत.
विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांतील पदवीच्या ७ एप्रिलपासून १२ एप्रिलपर्यंत होणाऱ्या पदवीच्या परीक्षा १९ एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत होणार आहेत. ७ रोजीचा पेपर १९ रोजी, ८ रोजीचा पेपर २० रोजी, ९ रोजीचा पेपर २१ रोजी, १० रोजीचा पेपर २२ रोजी, ११ रोजीचा पेपर २३ रोजी, १२ रोजीचा पेपर २४  रोजी होईल.

पदव्युत्तरच्या ७ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत होणारे पेपर २५ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत होणार आहेत. ७ रोजीचा पेपर २५ रोजी, ८ रोजीचा पेपर २६ रोजी, ९ रोजीचा पेपर २७ रोजी, १५ रोजीचा पेपर २८ रोजी, १६ रोजीचा पेपर २९ रोजी होईल. एमबीए परीक्षेचे ७ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत होणारे पेपर २५ ते ४ एप्रिलपर्यंत होणार आहेत. ७ रोजीचा पेपर २५ रोजी, ८ रोजीचा पेपर ३० रोजी, ९ रोजीचा पेपर २ मे रोजी, ५ रोजीचा पेपर ३ मे रोजी, तसेच १६ एप्रिलचा पेपर ४ मे रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT