Satara Corona 
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात उद्रेकाला प्रारंभ : दिवसात ७७ रूग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी सकाळी 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्या धक्क्यातून जिल्हा सावरत असताना सायंकाळी आणखी सहा जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याबाबतची माहिती जिल्हावासीयांना होते न होते तोच रात्री नऊच्या सुमारास आणखी 31 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने लोकांचा काळजाचा ठोका चुकला. एकाच दिवशी ७७ रूग्ण आढळल्याने कोरोनाचा सातारा जिल्ह्यातील उद्रेकच म्हणावा लागेल. 

रात्री नऊच्या सुमारास  आलेल्या रिपोर्टमध्ये कराड तालुक्यातील 8, वाई तालुक्यातील 8 आणि सातारा तालुक्यातील दहा जणांचा समावेश होता. परवा पाचगणीतील मृत्यू झालेल्या महिलेचाही यात समावेश आहे. त्यामुळे आज दिवसभरात ७७ रुग्ण सापडण्याचा उच्चांक झाला,  

जिल्ह्यातील एकूणरुग्णांची संख्या 278 इतकी झाली.  तत्पूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये पाटण तालुक्यातील चार तर कऱ्हाड तालुक्यातील
म्हासोलीतील दोन बाधीतांचा समावेश आहे. त्यामुळे एका दिवसात जिल्ह्यात 77 बाधीत रूग्‍्‍ण सापडल्याने कोरोनाचे सावट गडद झाल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यात शुक्रवारी एकही बाधीत न सापडल्याने दिलास मिळाला असतानाच आज सकाळी सुमारे 77 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा हादरून गेला. यात कऱ्हाड, पाटण, फलटण, माण, सातारा, खंडाळा, वाई तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. एकाच दिवशी 77 बाधीत रूग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

बाधीतामध्ये  पाटण तालुक्यातील ढेबेवाडीतील 18 वर्षीय युवती तसेच 23 वर्षाचा युवक व 44 वर्षाची महिला, गलमेवाडी येथील 24 वर्षीय महिला तसचे कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली येथील 15 वर्षाची मुलगी व 17 वर्षाचा पुरूषाचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यातील आठ बाधितांपैकी पाच वानरवाडी येथील तर तीन शेणोली येथील एकाच कुटुंबातील आहेत. एकाच दिवसात बाधीतांची संख्या 77 झाल्याने  प्रशासनासह आरोग्य विभागही चक्रावून गेला आहे. जिल्ह्यात आजअखेर 278 बाधीतांची नोंद झाली असून त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या, मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने खळबळ

Pune Traffic : पुणे-बंगळूर सेवा रस्त्यांची बिकट अवस्था! खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त; पावसाळ्यात धोकादायक स्थिती

Anurag Thakur: देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट; भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल यांच्या टीकेचा समाचार

लग्न ठरत नाही म्हणून ढसाढसा रडली स्वानंदी, प्रोमो पाहून प्रेक्षक हळहळले "या तिच्या खऱ्या भावना"

VIDEO VIRAL: श्रद्धाने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली... 'हे नखरे सहन करु शकतो का?' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT