नगर ः राशीगटातील तीन राशींना आजचा शिमग्याचा दिवस चांगला नाही. डेंजर झोनमध्ये असलेल्या राशीच्या लोकांनी आज सावधगिरी बाळगली पाहिजे.
मेष - आज तुम्हाला आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खर्च वाढला तरी कशाची ददाद पडणार नाही. त्यामुळे बॅॅलन्स करता येईल.आखलेल्या योजना मात्र तपासून घ्याव्या लागतील.
वृषभ- गेल्या काही दिवसांपासून तुम्ही समस्येने त्रस्त आहेत. मात्र, आजच्या दिवशी सुटेल.स्थावरात गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही. त्यात लाभ होईल. लक्ष्य गाठायचं असेल तर थांबू नका.
मिथुन - इतरांना प्रभावित करण्यावर जास्त वेळ वाया घालवू नका. कुटुंबियांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल. तुमच्या आवडत्या व्यक्तीला भावनिक आधार द्याल. यश तुमच्या समोर आहे.
कर्क - तुमची कोणासोबत पार्टनरशीप असेल तर सावध रहा. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. आपली प्रिय व्यक्ती म्हणेल हे वागणं बरं नव्हं.
सिंह - सावधगिरी बाळगल्यास समस्या निर्माण होणार नाहीत. लक्षपूर्वक गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी गैरवर्तन होणार नाही याची काळजी घ्या. वेळ आजिबात दवडू नका. मात्र, मित्रांसोबतची साथ फलदायी ठरेल.
तुळ - समस्यांचा सामना करावा लागेल. आज तोंडावर जरा नियंत्रणच ठेवा. प्रेम प्रकरणही अंगलट येण्याची शक्यता. तुम्ही दानशूर आहात, त्यामुळे इतरांना मदत कराल.
वृश्चिक - कामाचा ताण येऊ शकतो. जोडीदारासोबत चांगले समजून घेण्यामुळे आयुष्यात आनंद मिळेल. प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.
धनु - बोलण्याआधी विचार करावा लागेल नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. नवीन करार फायदेशीर वाटू शकतात. परंतु त्यांना अपेक्षित लाभ मिळणार नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीचे न्यून शोधू नका.
मकर - दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल. नवीन कल्पनांनी परिपूर्ण व्हाल. जोडीदारासोबत वाद होतील. त्यामुळे सावध रहायला हवं.
कुंभ - आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. अचानक शोध मिळण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे. आपल्याला समोर आलेल्या परिस्थितीतून दोनपैकी एकाची निवड करावी लागेल. वाद होतील, तेही आवडत्या व्यक्तीसोबतच. तेव्हा सावध.
मीन- राग येऊ शकतो, अतिकामाचा. नवीन कल्पना आपला आर्थिक फायदा करेल. बेजबाबदार वागू नका. त्याचा मोठा फटका बसेल. कुटुंबात समस्या निर्माण होऊ शकतात. डोळ्यावर पट्टी बांधू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.