Tourism under the name of Khelo India marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

"खेलो इंडिया'चे नावाखाली "त्यांची' चंगळ

अमित आवारी

नगर : गुवाहाटी (आसाम) येथील "खेलो इंडिया' या स्पर्धेसाठी राज्य सरकारकडून खेळाडू व प्रशिक्षकांची विमान प्रवासाची सोय केली आहे. हेच शासन शालेय राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू व प्रशिक्षकांना दुय्यम वागणूक देते. रेल्वेचे आरक्षण मिळवतानाही त्यांची दमछाक होते. या सापत्नपणाबद्दल क्रीडावर्गात नाराजीचे वातावरण आहे. 

गुवाहाटी (आसाम) येथे 9 ते 21 जानेवारी या कालखंडात "खेलो इंडिया' युवा राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. 17 व 21 वर्षे वयोगटात 19 क्रीडा प्रकारांत महाराष्ट्रातील संघ "खेलो इंडिया' स्पर्धेत सहभागी झाले आहेत. संघासोबत व्यवस्थापक, मार्गदर्शक व सहमार्गदर्शकांसह खेळाडू गुवाहाटीत दाखल झाले आहेत. काही संघ अजून जाणार आहेत. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विमानसेवा पुरविली. मात्र, या खेळाडूंच्या नावाखाली इतरांचेच पर्यटन झाले आहे. 

खेळाडू घडविणारे बाहेरच

खेळाडूंसोबत 101 मार्गदर्शक, व्यवस्थापकांपैकी जवळपास 85 जण क्रीडा खात्यात विविध जिल्ह्यांत कार्यरत आहेत. उर्वरित संघटनेचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आहेत. यातील अनेकांची निवड ज्या खेळासाठी झाली आहे, त्या खेळाचे त्यांना कितपत ज्ञान आहे, याबद्दल शंका आहे. या स्पर्धेसाठी जे खेळाडू निवडले आहेत, ते विविध जिल्ह्यांतील आहेत. स्वतंत्र निवड चाचणी घेऊन त्यांची निवड केली. मात्र, ज्या शिक्षकांनी अपार कष्ट करून या खेळाडूंना घडविले, त्यांना मात्र डावलले आहे. 

शालेय राष्ट्रीय स्पर्धेबाबत दुजाभाव

स्पर्धेस जाण्यासाठी काहींनी तर थेट मंत्रालयातून स्वतःचे नाव टाकण्यासाठी दबाव टाकल्याची चर्चा आहे. एकीकडे शालेय राष्ट्रीय स्पर्धेला जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे संघांना मिळत नाही. दुसरीकडे मात्र विमानाने प्रवास, पर्यटन होणार असल्याने क्रीडा विभाग सरसावला आहे. 

सरकारनेच हा भेदाभेद दूर करावा

शालेय राष्ट्रीय स्पर्धांच्या तारखा व ठिकाण महिनाभर आधी निश्‍चित होते. तरीही खेळाडूंच्या प्रवासाचे तिकिटाचे आरक्षण अनेक वेळा होत नाही. "खेलो इंडिया'प्रमाणे शालेय स्पर्धेत खेळाडू व मार्गदर्शकांच्या प्रवासाची व्यवस्था शासनाने विमानाने केल्यास खेळाडूंना न्याय मिळेल. सरकारनेच हा भेदाभेद दूर करावा. 
- राजेंद्र कोतकर, अध्यक्ष, राज्य क्रीडाशिक्षक महासंघ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT