trafic jam in ahmednagar
trafic jam in ahmednagar 
पश्चिम महाराष्ट्र

"ते' नाईंटीवर नाचले अन हे वाहनात अडकले! 

सकाळ वृत्तसेवा

नगर : सध्या लग्नाची धामधूम आहे. लग्नापूर्वी नवरदेवाची वरात काढली जाते. त्या वरातीत नाचणाऱ्यांची काही कमी नसते. डीजे लागला की वऱ्हाडी मंडळींच्या अंगात घुमायला लागतं. काहीजण तऱ्हाट झालेले असतात. आजच्या काही वरातीत हेच जाणवलं. या वराती हमरस्त्यातून काढल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होत असते. 

लग्नसराईमुळे पाहुण्यांची वर्दळ व शहरात दिवसाही सुरू असलेल्या जड वाहनांचा प्रवेश, यामुळे नगर शहरातील सर्व मार्गांवर आज सुमारे तीन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही वाहनांनी शहरातून प्रवेश केल्याने शहराच्या अंतर्गत भागांतही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली. 
लग्नसराईतील आज मोठी तिथी असल्याने शहरातील सर्व मंगल कार्यालयांमध्ये विवाहाची धामधूम होती. सकाळपासूनच पाहुणे मंडळी त्यांच्या वाहनांसह मंगल कार्यालयाकडे जात असल्याचे दिसले. दुपारी पाऊणच्या सुमारास सर्व कार्यालयांत विवाह असल्याने सकाळी अकरापासूनच पाहुणे मंडळींची मंगल कार्यालयाच्या दिशेने जाण्याची लगबग सुरू होती. बाह्यवळण रस्ता खराब असल्याने जड वाहनेही शहरातून येत आहेत. यातच शासकीय कार्यालये सुरू होण्याची व शाळा सुटण्याची वेळ असल्याने शहरात सर्वत्र 
वाहनांची कोंडी वाढली. 

वीजपुरवठा केला जातो बंद 
शहरात आज काही वेळ महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे काही भागांतील रस्त्यांवरील सिग्नल बंद होते. परिणामी वाहतुकीचे नियोजन अवघड झाले. वाहतूक पोलिसांनी माहिती मिळताच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र तरीही कोंडी सुटत नव्हती.

पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविली

केडगावजवळील रेल्वे उड्डाणपूल ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय चौकापर्यंतचा रस्ता, सक्‍कर चौक ते नेप्ती चौक या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होती. दुपारी दोननंतर मंगल कार्यालय परिसरांतील गर्दी कमी झाल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविली. या रस्त्यांवर शहरातील तिन्ही बसस्थानके असल्याने एसटी महामंडळाच्या काही बसही उशिरा धावत होत्या. 

वाहतूक कोंडी नित्याचीच 
नगर-दौंड रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याचे कायनेटिक चौकाजवळील काम सुरू असल्याने तेथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. सायंकाळी कार्यालये व शाळा सुटण्याच्या वेळेतही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT