The tree fell and the road was closed 
पश्चिम महाराष्ट्र

संचारबंदीतही एवढी वाहने कशी? 

सकाळवृत्तसेवा

तासगाव : तासगाव-सांगली रस्त्यावर आज दुपारी चार सव्वाचार वाजता कुमठे फाटा ते कवठेएकंद दरम्यान वादळी वाऱ्याने झाड कोसळून रस्ता बंद झाल्याने असंख्य वाहने अडकून पडल्याचा प्रकार घडला. मात्र यामुळे संचारबंदी काळात इतकी वाहने रस्त्यावर आलीच कशी ? हा प्रश्नही पुढे आला आहे. अत्यावश्‍यक सेवा म्हणून दिलेल्या परवान्यांचे काय ? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. 

तासगाव-सांगली रस्त्यावर आज एक झाड कोसळले. रस्ता बंद झाला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी कित्येक दुचाकी आणि कित्येक चारचाकी गाड्या खोळंबल्या. मुळात जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेरगावी जाता येत नाही. भाजीपाला, औषधे, अन्नधान्य वाहतूक परवाने देण्यात आले आहेत. अगदी दवाखान्यात पेशंट न्यायचा झाल्यास ऑनलाईन परवानगी घ्यावी लागते.

या पार्श्वभूमीवर झाड कोसळल्याने अडकलेल्या गाड्या कसल्या होत्या ? इतक्‍या मोठ्या प्रमाणावर तासगाव-सांगली रस्त्यावर इतक्‍या दुचाकी कशा अडकल्या ? या सगळ्याकडे अत्यावश्‍याक वाहतुकीचे परवाने होते का ? दोन्ही बाजूला असंख्य वाहने अडकले असताना लवकर रस्ता मोकळा होत नाही म्हटल्यावर अनेकांनी रस्ते बदलून वाहने बाहेर काढली. 

कवठेएकंद ग्रामस्थांचे सहकार्य 
कवठेएकंद ः सांगली-तासगाव रोड वरील कवठे एकंद नजीक ऐसर पंपाजवळ बाबळीचे मोठे झाड रस्त्यावर आडवे पडले. काही काळ वाहतूक ठप्प झाले. कवठेएकंद, नागाव कवठे व कुमठे या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. काही झाडे उन्मळून पडली. मोठा वारा व झाड पडल्यामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. तासगाव-सांगली रोडवर कवठेएकंद नजीक झाड पडल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली.

रस्त्यावरून झाड काढण्यासाठी कवठेएकंद ग्रामपंचायत सदस्य विजय माने यांच्या जे सी बी ने काढण्यात आला. यावेळी राजू पाटील, कुमार माळी, सचिन माळी, अजित बिरनाळे, संतोष मगदूम, अनिकेत मगदूम, अमोल तुंगे, तसेच राहुल माळकर, काकडवाडी पोलिस पाटील सयाजी पाटील यांच्या सहकार्यातून झाड काढण्यास व वाहतूक सुरळीत करण्यात मदत झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अर्धा तास उशिराची मुभा; सरकारचा निर्णय, कारण काय?

अन् अर्जुनचा साक्षीला चेकमेट! कोर्टात दाखवला 'तो' पुरावा'; सगळेच शॉक, 'ठरलं तर मग'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Eknath Shinde : राजकीय समीकरणे बदलणार? येवला तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढतेय

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT