0murder_93.jpg
0murder_93.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अंधश्रद्धेच्या रागातून आदिवासी महिलेची निघृण हत्या

भगवान खैरनार

मोखाडा (ता. जव्हार) : येथील आदिवासी भागात अंधश्रद्धेचा पगडा आजही कायम असून, या आदिवासी भागात भगतगीरी, बुवाबाजी, भूत लागणे, भूत काढणे, काटा काढणे, आजारपण करून टाकणे, असे अंधश्रद्धेचे प्रकार आजही घडत आहेत. तर, अशिक्षितपणामुळे अंधश्रध्देचा पगडा आदिवासींवर कायम असल्याचे समोर आले आहे. जव्हार मधील ओझर गावातील संती बाबाजी टेंबरे (60) या आदिवासी वृध्द महिलेस भुताळी असल्याच्या संशयावरून तिच्याच नात्यातील मालवण बाळू टेंबरे (29) याने कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
 
जव्हार पासून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या ओझर गावातील अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या मालवण बाळू टेंबरे (29) याने त्यांच्याच टेंबरे कुटुंबातील संती बाबाजी टेंबरे (60) या महिलेवर अंधश्रद्धेच्या रागातून कोयत्याने वार करून व दगडाने ठेचून ठार मारल्याची खळबळजनक घटना शनिवारी 9 फेब्रुवारीला घडली आहे. सदर महिले, ''तू भुताळी आहेस व तुझ्यामुळे माझ्या घरातील मुलं, माणसं आजारी पडत आहेत. तू भुताळपणा करून आमच्या घराच्या मंडळींना आजारी पाडण्याचे काम तूच करतेस.''

पोलीस तपासातून ही घटना समोर आल्याने, संपूर्ण पालघर जिल्हयात खळबळ उडाली असून, आदिवासी भागात व समाजात आजही अंधश्रद्धेचा पगडा कायम असल्याचे समोर आले आहे. मयत संती टेंबरे हिचा पती बाबाजी टेंबरे याच्या फिर्यादीवरून जव्हार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला असून, मालवण बाळू टेंबरे या आरोपीस अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे जव्हार पोलीसांनी सांगितले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT