Trolley thief caught; Compromised and released! 
पश्चिम महाराष्ट्र

ट्रॉली चोर पकडले; तडजोड करून सोडलेही!

संजय आ. काटे

श्रीगोंदे : वर्षापूर्वी शहरातील ट्रॅक्‍टरची ट्रॉली चोरीला गेली होती. या चोरीचा गुन्हा दाखल झाला; मात्र पोलिसांनी तपास केला नाही. दरम्यान, ज्यांची ट्रॉली चोरीला गेली होती, त्यांनीच या घटनेचा तपास लावला आणि ट्रॉलीसह चोरही पकडून देण्यात मदत केली. मात्र, श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील काही धाडसी पोलिसांनी तडजोडास्र वापरले आणि आरोपी सहीसलामत सोडून दिले! 

श्रीगोंदे पोलिसातील एका "तडजोड टीम'ची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. याबाबत पोलिसांमध्ये दबक्‍या आवाजात सुरू असणारी चर्चा आता खुलेआम होत आहे. या टीममधील पोलिसांच्या मोठ्या करामती सध्या गाजत आहेत. यातील नवे प्रकरण घडले आणि आता "यांना आवरा' असा सूर उमटू लागला आहे. 

गेल्या वर्षी शहरातील एका शेतकऱ्याची ट्रॅक्‍टरची ट्रॉली चोरीला गेली. त्याने त्याबाबत फिर्याद दिली; मात्र पोलिसांना या चोरीचा तपास करण्यास वेळ मिळाला नाही. मात्र, ज्याची ट्रॉली चोरीला गेली, ते पोलिसांच्या कायम सहवासात असल्याने त्यांना चोरीचा तपास करण्याचे थोडे तंत्र माहीत होते. त्यांना चैन पडली नाही. शेवटी चार दिवसांपूर्वी ट्रॉली व आरोपी सगळेच त्या व्यक्तीने पोलिसांना खबर देऊन पकडले. 

अर्थात आरोपी ताब्यात घेण्याचे काम करणाऱ्या या टीमने मूळ ट्रॉली मालकाला "हा विषय संपवून काही पैसे व ट्रॉली घे' असा "मध्यममार्ग' सुचविला. मात्र, "चोरांवर कारवाई करा' हा त्याचा आग्रह राहिला. शेवटी या टीमच्या पोलिसांनी त्यांचे "तडजोडास्त्र' वापरले आणि पकडलेले आरोपी सोडून देत काही झालेच नाही असा आव आणला. ज्याची चोरी झाली होती, त्याला ट्रॉली मिळालीही असेल; मात्र यात काही पोलिसांचीच चांदी झाली. 

त्या टीमला सर्वच वैतागले 
श्रीगोंदे पोलिसांच्या या टीमने सध्या धुमाकूळ घातला आहे. वाळूच्या कारवाया करण्याच्या नावाखाली वेगळीच प्रकरणे शिजवली जात आहेत. शहरातील एका लॉजवरून त्यांचा कारभार सुरू असतो. अवैध धंदेचालकांसह श्रीगोंदे ठाण्यातील प्रामाणिक पोलिस त्यांना कमालीचे वैतागले आहेत. मात्र, या टीमच्या डोक्‍यावर वरिष्ठांचा हात असल्याने त्यांच्या तक्रारी होत नसल्याचे समजले. 

चौकशी करून कारवाई 
याबद्दल निश्‍चित माहिती घेऊ. यात वास्तव असेल, तर गंभीर बाब आहे. चौकशी करू. कोणी दोषी आढळले, तर योग्य ती कारवाई होईल. 
- संजय सातव, पोलिस उपअधीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मोदी कुठेही जाणार नाहीत’ हा अहंकार! कॉकरोच जनता पार्टीचा भाजपवर हल्लाबोल; स्मृती इराणींची 'ती' पोस्ट शेअर करत टीका...

Reliance Share Price: रिलायन्सचा शेअर 7% वाढला! गुंतवणूकदारांची तासाभरात 1 लाख कोटींची कमाई; कारण काय? शेअर आणखी वाढणार?

Sangli DCC Bank : जत 'अ' सोसायटी गटात 100 टक्के मतदान; आमदार पडळकरांची प्रतिष्ठा पणाला, गोपनीयतेच्या भंगावरून सावंत समर्थकांचा आक्षेप, किरकोळ वाद

Latest Marathi News Live Update : इरई धरणात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक, चंद्रपुरात पाणी कपात करू नका : आमदार किशोर जोरगेवार

India Playing XI vs NZ 1st ODI: श्रेयस अय्यर OUT, ऋतुराज गायकवाड IN! ट्वेंटी-२० गाजवणारा थेट वन डे संघात; पहिल्या सामन्यासाठी भारताचे तगडे ११ शिलेदार...

SCROLL FOR NEXT