Twenty-one people are infected with coronary disease due to the Merckz program
Twenty-one people are infected with coronary disease due to the Merckz program 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमधील २१जणांना मरकजमुळे कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यातील 25 कोरोनाग्रस्तांपैकी 21 जण दिल्लीतील मरकज कार्यक्रमाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. मरकजशी संबंधित नगर शहरात कोणी व्यक्ती असतील, तर त्यांनी स्वत:हून जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांद्वारे करण्यात येत आहे. यासंबंधी कोणी माहिती लपवून ठेवली तर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात येत आहे. 

मरकज कार्यक्रमातील व्यक्तींच्या संपर्कात नगर शहरातील काही लोक आल्याने शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. नगर शहरातील मुकुंदनगर, सर्जेपुरा या ठिकाणी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. नगर शहराला लागून असलेल्या आलमगीर येथेही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. 

कचरा संकलन करणाऱ्या व स्वच्छेतसंबंधी प्रबोधन करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाड्या सध्या कोरोनासंबंधी जनजागृतीचे काम करीत आहेत. महापालिका आयुक्तांच्या नावे नागरिकांना आवाहन करण्यात केले जात आहे. कचरा उचलण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या या गाड्या पोलिसांचा सायरन वाजवीत शहात फिरत आहेत. 

त्याचबरोबर दिल्लीतील मरकज कार्यक्रमाशी शहरातील कोणाचा संपर्क आला असेल, त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. अन्यथा, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT