Two and a half acre grape garden flat in zare sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

Video : कोरोना पाठोपाठ निर्सगाने दिला मोठा दणका....

सकाळ वृत्तसेवा

झरे (सांगली) : परिसरामध्ये काल सायंकाळी विजांचा कडकडाट सुसाट वारा व पाऊस यामध्ये शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष ,गहू, हरभरा, मका, ज्वारी व अन्य पिके भुईसपाट झालीआहेत ,त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .अचानक आलेल्या या वादळामुळे झाडेही उन्मळून पडली आहेत. 

 झरेतील आप्पा भानुसे यांची सहा एकर द्राक्ष बाग आहे. त्यापैकी अडीच एकर द्राक्ष बाग रात्री वादळामध्ये कोलमडून भुईसपाट झाली आहे. त्यामध्ये त्यांचे जवळपास 10 लाखाचे नुकसान झाले असून  मागील अवकाळी पावसामध्ये सर्व द्राक्षे खराब झाले होते .त्यामध्ये त्यांचं नुकसान झालं होतं आणि आता यावर्षी बाग धरली त्यामध्ये रात्रीच्या वादळाने संपूर्ण बागच  भुईसपाट झाली .त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

झरेत आडीच एकर द्राक्ष बाग भुईसपाट
द्राक्षबाग भुईसपाट झालेली बातमी सकाळपासून वाऱ्यासारखी पसरली अनेक शेतकरी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली व शेतकरी आप्पा भानुसे यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी राज्याचे भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेआहे. श्री भानुसे यांची ही द्राक्ष बाग जमीनदोस्त झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी ,हरभरा, मका या पिकांचे नुकसान झालेले आहे, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठीकानी घराचे पत्रे जनावरांचे गोठे उडालेले आहेत. त्याचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब भरपाई शासनाने द्यावी.अशी मागणी केली.

उपस्थिती

यावेळी माजी समाजकल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर, सामाजिक कार्यकर्ते अधिक माने, मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन दिलीप खिलारी, शेतकरी अप्पा भानुसे व त्याचे कुटुंब उपस्थित होते.सदस्य हरिदास कांबळे, संजय पाटील व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व द्राक्ष बागातदार शेतकरी यावेळी उपस्थित होते. कृषी विभागाचे कृषी सहायक रामदास ढवळे यांनी द्राक्ष बागेला भेट देऊन त्याचे पंचनामे केले. 

माझी एकूण सहा एकर द्राक्ष बाग आहे. त्यातील अडीच एकर द्राक्ष बाग रात्रीच्या वादळामध्ये भुईसपाट झाली आहे सर्वसाधारणपणे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

आप्पा भानुसे द्राक्ष बागायतदार

वादळ वारा पाऊस यामुळे अतोनात नुकसान​
रात्रीच्या वादळ वार्या मध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये द्राक्ष डाळिंब मका, हरभरा, गहू, ज्वारी अशा पिकांचे नुकसान झालेला आहे. अनेक जणांची घर पडलेली आहेत. घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत अशा सर्वांचे पंचनामे करून शासनाने भरपाई ताबडतोब द्यावी -

भाजप नेते गोपीचंद पडळकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT