two brother death one commits suicide Bijapur other coming for funeral died in accident sakal
पश्चिम महाराष्ट्र

अथणीच्या चुलत भावांचा विचित्ररित्या अंत

एकाची विजापुरात आत्महत्या ; दुसऱयाचा मंगसुळीजवळ अपघात

सकाळ वृत्तसेवा

अथणी : येथील चुलत भावांचा विचित्ररित्या दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. एकाने विजापुरात आत्महत्या केली तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठीपुण्याहून येणाऱया चुलत भावाचा कागवाड तालुक्यात मंगसुळीजवळ अपघात होऊन मृत्यू झाला. अभिषेक मल्लिकार्जुन गोटखिंडी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या, तर उदय शिवशंकर गोटखिंडी (वय ३६) असे अपघाती मृत्यू झालेल्या भावाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अभिषेक मल्लिकार्जुन गोटखिंडी याला ऑनलाईन रमी गेमचे व्यसन जडले होते. या नादात तो कर्जबाजारी झाला होता. त्याने लाखो रुपयांचे कर्ज काढले होते. ते भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी तगादा लावून शिवीगाळ केली. त्यामुळे ही बाब मनाला लावून घेऊन त्याने विजापुरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी गोलघुमट पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.

आपला चुलत भाऊ अभिषेक याचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे येथे खासगी कंपनीत काम करीत असलेल्या उदय शिवशंकर गोटखिंडी याला समजली. आपल्या चुलत भावाच्या अंत्यसंस्कारासाठी शुक्रवारी (ता. ६) येण्यास निघाला. मात्र वाटेत रात्री कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावाजवळ झालेल्या अपघातात त्याचाही मृत्यू झाला. कागवाड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. या चुलत भावांच्या मृतदेहांवर एकाच ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अभिषेक गोटखिंडी व उदय गोटखिंडी या चुलत भावांवर काळाने विचित्र पद्धतीने घाला घातला. त्यामुळे गोटखिंडी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांना एकदम काळाने हिरावून गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT