Two died in two wheeler accident in shevgaon 
पश्चिम महाराष्ट्र

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन्ही चालकांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : शेवगाव-गेवराई रस्त्यावर शहरातील नित्यसेवा रुग्णालय परिसरात दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता.4) दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. शहादेव अर्जुन सातपुते (वय 50, रा. तळणी, ता. शेवगाव) व अमोल अरुण देठे (वय 30, रा. शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.4) दुपारी बाराच्या सुमारास पैठण रस्त्याने सातपुते हे दुचाकीवर (एमएच 16 सीएन 1399) तळणीकडे जात होते. तर अमोले देठे हे दुचाकीवरून (एमएच 16 बीजे 3971) शेवगावकडे येत होते. शेवगाव शहरातील नित्यसेवा रुग्णालयाजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरात धडक बसली. या अपघातात सातपुते व देठे यांच्या डोक्‍याला मार लागून मोठा रक्तस्त्राव झाला होता. 

उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू

नागरिकांनी त्यांना तातडीने शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. याबाबत शेवगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलिस नाईक रामेश्वर घुगे करीत आहेत. सातपुते यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. देठे यांच्यामागे आई-वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगी असा परिवार आहे. येथील व्यावसायिक किरण देठे यांचे ते बंधू होत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT