Two lakh cannabis seized in Miraj; Four arrested, including two women from Latur, Parbhani 
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत दोन लाखांचा गांजा जप्त; लातूर, परभणीतून आलेल्या दोन महिलांसह चौघांना अटक

प्रमोद जेरे

मिरज : शहरातील माणिकनगर रेल्वे चाळ परिसरात महात्मा गांधी चौक पोलिसांनी दोन लाख सात हजार रुपये किमतीचा 700 ग्रॅम गांजा जप्त केला. हा गांजा मिरज शहरात विक्रीसाठी आणलेल्या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली. आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. गांजा विक्रीसाठी आणलेली आलिशान मारुती गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लातूर आणि परभणी जिल्ह्यातून काही गांजा विक्रेते शहरात गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील यांना मिळाली.

त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी शहरात येणाऱ्या गाड्यांची तपासणी आणि रेल्वेस्थानक तसेच माणिकनगर परिसरात गस्त सुरू केली. यावेळी पांढऱ्या रंगाची एका मोटारीतून (एमएच 13, एझेड 3808) चौघेजण संशयितरित्या माणिकनगर परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना हटकून गाडीची तपासणी केली असता, गाडीत लपवलेला 700 ग्रॅम गांजा पोलिसांना मिळाला. 


या चौघांकडे चौकशी केली असता, हा गांजा मिरज शहरातील गांजा विक्रेत्यास विकण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार संबंधित गांजा विक्रेत्याचा तपास सुरू आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्यांमध्ये संजय तात्याराव ससाने (वय 43), महादेव विश्वनाथराव शिंदे (वय 56, दोघेही रा. लातूर) यांच्यासह रंजना नामदेव कदम (वय 36, रा. परभणी) आणि रुक्‍मिणी महादेव जाधव (वय 34, रा. लातूर) यांचा समावेश आहे.

या कारवाईत अमर मोहिते, अमोल काळे, चंद्रकांत गायकवाड, अमोल आवळे, गणेश कोळेकर रावसाहेब सुतार, कोमल धुमाळ, आदिती पवार यांनी सहभाग घेतला. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT