Two months after vaccination on the corona 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनावर लस दोन महिन्यांनी... पण घाबरू नका आपल्याकडे पुरेसा औषधसाठा - शिंगणे

सकाळ वृत्तसेवा

नगर ः ""कोरोनावर अद्याप कोणतेही औषध नसले, तरी त्यासाठी उपयोगात येणाऱ्या औषधांचा राज्यात मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने अजिबात काळजी करण्याची गरज नाही. राज्यातील रेड झोन वगळता इतर जिल्ह्यांत लवकरच उद्योगधंदे सुरू करण्यात येणार आहेत,'' असा विश्‍वास अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""कोरोनावर मात करण्यासाठी दोन महिने तरी विशिष्ट औषध उपलब्ध होणार नाही. सुरवातीच्या काळात सॅनिटायझरचा तुटवडा होता. त्यानंतर सरकारने तातडीने राज्यातील 288 कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तरी सॅनिटायझरचा तुटवडा येणार नाही. फूडच्या बाबतीत बहुतांश कंपन्यांचे उद्योगधंदे राज्याच्या बाहेर आहे. त्यामुळे मजूर उपस्थिती कमी असून, उत्पादनही कमी होत आहे. मात्र, आता सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आगामी काळात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा भासणार नाही.'' 

अन्यथा कारवाई 
लॉकडाउनच्या काळात अनेकांनी मुदतबाह्य औषधे विकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने आळा घालण्यात आला. यापुढे चढ्या भावाने किंवा मुदतबाह्य औषधे विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT