peacock sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : सांगलीत दोन मोरांची शिकार; वनविभागास कोणत्याही प्रकारचे गांभिर्य नसल्याची नागरीकांनी केली टिका

नागरीकांनी पकडले मुलास; पोलिसांची सर्तकता; वनविभाग फिरकले नाही

सकाळ वृत्तसेवा

सांगली : येथील जुना बुधगाव रस्त्यावरील समाजकल्याण कार्यालयानजिक असणाऱ्या संभाजी कॉलनी येथे दोन मोरांची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली. एक मोर आणि एक लांडोर यांची शिकार करून घेवून जाणाऱ्या टोळीचा परिसरातील नागरीकांनी पाठलाग केला. त्यातील एका अल्पवयीन मुलास नागरीकांनी पकडून ठेवले.

दरम्यान, याबाबत माहिती मिळलात शहर पोलिस, प्राणीमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागास संपर्क साधण्यात आला. मात्र तीन तास उलटले तरी वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. राष्ट्रीय पक्ष्याची शिकार झाल्यानंतरही वनविभागास कोणत्याही प्रकारचे गांभिर्य नसल्याची टिका परिसरातील नागरीकांनी केली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिका आवास योजना परिसरालगत संभाजी कॉलनी आहे. याठिकाणी शेतीचा परिसर असल्याने मोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आज सकाळी एक टोळके जाळ्या घेवून शेतात दबा धरून बसले होते. सकाळाच्या सुमारास त्यांनी एक मोर आणि एक लांडोर यांची शिकार केली. पोत्यात भरून ते निघाले होते.

दरम्यान, परिसरातील काही सजग नागरीकांना संशय आला. त्यांनी विचारपुस करण्यास सुरूवात केली. त्यानंतर टोळीतील महिलांसह मुलांनी पोत खाली टाकत पळ काढला. त्यानंतर नागरीकांनी पाठलाग सुरू केला. एका अल्पवयीन मुलास पकडण्यात आले. टोळीतील अन्य पसार झाले. पोते उघडल्यानंतर मोरांची शिकार झाल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार झाकीरहुसेन काझी, डॉनियल घाटगे, संतोष गळवे यांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. मोरांची शिकार झाल्याने नागरीकांनी हळहळ व्यक्त केली. प्राणीमित्रांसह पोलिसांनी वनविभागाशी संपर्क साधला. मात्र, कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी संपर्क साधला परंतू वनविभागाचे कर्मचारी फिरकले नाहीत.

शिकारीचा मुद्दा ऐरणीवर

दरम्यान, प्राणीमित्र आणि पोलिसांनी मोराचे मृतदेह घेवून वनविभाग गाठला. सायंकाळी पाचनंतरही कोणताही पंचनामा करण्यात आला नव्हता. विभागाकडून मनुष्यबळ तोकडे असल्याचे कारण पुढे करून पेट्रोलिंग होत नसल्यामुळे जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारी होण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

१९२६ वर संपर्क साधा

वन्यजीवांच्या संरक्षणार्थ वेगवेगळ्या वर्गवारीत संरक्षण दिले जाते. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. तो शेड्युल एकमध्ये सरंक्षण देण्यात आले आहे. शिकार किंवा तस्करी करणाऱ्याला तीन ते सात वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. तसेच एक लाखांपर्यंत दंडही होतो. कुठे वन्यप्राण्याची शिकार अथवा तस्करी होत असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT