सांगली- जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अद्यापही तीन टक्के म्हणजे दीड ते दोन हजार एकर ऊस शेतामध्ये आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूरांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे शिल्लक ऊसाचा प्रश्न भेडसावणार आहे. ऊस तोड लवकर व्हावी म्हणून काही ठिकाणी फड पेटवण्याचे प्रकारही घडू लागलेत.
जिल्ह्यातील दत्त इंडिया कंपनी, राजारामबापू कारखाना आणि हुतात्मा किसन अहीर हे साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. त्यातील दत्त इंडियाचा गळीत हंगाम सोमवारी (ता. 30) बंद होणार आहे. "कोरोना' च्या भितीने ऊस तोड मजूरांमध्ये देखील धास्ती आहे. अनेकांना गावाकडे परतण्याचे वेध लागले आहेत. बरेच मजूर आठवड्यापूर्वीच परतले आहेत. कारखाना प्रशासनाने विनंती करून काही कामगारांना थांबवून ठेवले आहे. कसाबसा हंगाम संपवण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे एक लाख 80 हजार एकरवर ऊसाची लागण झालेली होती. यंदा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पाऊस तसेच "एफआरपी' च्या वादातून ऊस गाळपास महिनाभर विलंब झाला.सांगली जिल्ह्यातील 16 पैकी 12 कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले. यंदा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे ऊस क्षेत्र घटले आहे. त्यामुळे जेमतेम तीन ते चार महिने हंगाम चालेल असे चित्र होते. शेवटच्या टप्प्यात अधिकाधिक गाळपासाठी स्पर्धा रंगेल असे चित्र होते. परंतू "कोरोना' चे सावट आल्यामुळे हंगाम आटोपता घेण्यात आला.
जिल्ह्यातील दत्त इंडिया, राजारामबापू आणि हुतात्मा हे तीन साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. मात्र कोरोनामुळे ऊसतोड मजुरांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी पडणाऱ्या कडक उन्हाळ्यात मजुरांची घालमेल सुरू झाली आहे. "कोरोना' मुळे जिल्हा स्थलांतर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. ऊस तोड मजुरांना जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक सुविधा देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कारखान्यांना निर्देश दिले आहेत. तरीही ऊसतोड मजूर गावाकडे जाण्यासाठी धडपडत आहे. दत्त इंडियाचा हंगाम सोमवारी (ता.30) संपणार आहे. तसेच आठवडाभरात राजारामबापू व हुतात्मा कारखान्यांचा हंगाम संपेल असे चित्र आहे.
""जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. तरीही किमान दीड ते दोन हजार एकरावर ऊस शिल्लक राहण्याची भीती आहे. कारखान्यांनी हंगाम सुरू ठेवण्याची गरज आहे.
-महेश खराडे (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.