The type of phone tapping with a political contract; A thorough inquiry will reveal the truth: Vishwajit Kadam 
पश्चिम महाराष्ट्र

राजकीय सुपारी घेऊन फोन टॅपिंगचा प्रकार; सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल : विश्‍वजित कदम

घनशाम नवाथे

सांगली : पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी राजकीय सुपारी घेऊन फोन टॅपिंग केले आहे. यामागे भाजपचे कटकारस्थान आहे. त्यामुळे फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम येथे म्हणाले. 


केंद्रातील कृषी कायद्याविरोधात कॉंग्रेसने आज उपोषण करून शेतकरी संघटनांना पाठिंबा दिला. या आंदोलना दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. कदम म्हणाले,""भाजपची नीती आता सर्वांच्या लक्षात आली आहे. देशातील महत्त्वाचे प्रश्‍न बाजूला ठेवून दर महिन्याला एखादा वेगळाच मुद्दा त्यांच्याकडून समोर आणला जातो. त्यावरून राजकारण पेटवले जाते.

लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. केंद्रातील कृषी कायद्याविरोधात तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रश्‍नावर कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. अशावेळी वेगळाच मुद्दा घेऊन भाजप राजकारण करत आहे. राजकीय हेतूने फोन टॅपिंग करणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपने हे कटकारस्थान रचले आहे. राज्यात गेले काही दिवस जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. लोकशाहीत संसद व विधानसभा सर्वोच्च आहे. परंतु काही अधिकारी लोकशाही, संविधान धोक्‍यात येईल असे चुकीचे कृत्य करत आहे. याची चौकशी झाली पाहिजे.'' 


ते पुढे म्हणाले,""दिल्लीत तीन महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करीत आहे. परंतु त्याकडे लक्ष द्यायला भाजपला वेळ नाही. केवळ चर्चेचे नाटक केले जात आहे. शेकडो शेतकरी शहीद झाले तरी केंद्र सरकारला कायदा बदलण्यास तयार नाही. हे मोठे दुर्दैव आहे.

शेतकरी आंदोलन अंगलट येऊ लागल्याने भाजप काहीतरी वादग्रस्त वेगळे विषय उकरून काढून राजकारण करत आहे. स्टंटबाजी करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून रस्त्यावर उतरला आहे.'' 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT