पश्चिम महाराष्ट्र

मला शुभेच्छाही नकाेत : उदयनराजे भाेसले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : अखिल विश्‍वाचे पोट भरणाऱ्या बळीराजाच्या न थांबणाऱ्या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजतकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेरोजगारीने त्रासलेल्या युवा द्विधा मनस्थिती या आणि अशा अनेक बाबींचा विचार करुन आम्ही दरवर्षी राजरा होत असलेला 24 फेब्रुवारीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम व्यक्तींनी आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये असे आवाहन माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरत असते. खरंतर आम्हांस मुलतः वाढिवस साजरा करण्याची तीव्र इच्छा नसते. परंतु आमच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कोरोडो मनांचा उत्साह पहिल्यावर तमाम व्यक्तींच्या मनाचा आदर ठेवण्याकरीता यापुर्वी एक दोन वर्ष सोडून अनेक वेळा साजरा केलेला आहे. अशावेळी आम्ही आमच्या वाढदिनी औचित्य साधून जनसेवेच्या कामांचा शुभारंभ अथवा जनसेवेच्या कार्याची पुर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
 
तथापि अलीकडच्या काळात जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या आत्महत्या काही केल्या थांबलेल्या नाहीत. तसेच सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती पाहता आमचा वाढदिवस साजरा करणे आम्हांस उचित वाटत नाही. तरी आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पद्धतीने साजरा करु नये. त्यापेक्षा गोर गरीब जनतेच्या आवश्‍यक गरजांच्या पुर्ती करीता परस्पर त्यांना मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम व्यक्तींनी आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये असे आवाहन माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
 
सविस्तर वाचा : 'हे" सरसावले शिवयारांची भवानी तलवार भारतात आणण्यासाठी

हेही वाचा :  ‘कास’वरील शेवाळाला डॉ. वाटवे यांचे नाव
 
जरुर वाचा :  उदयनराजे भाेसलेंचा जनतेस संदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

SCROLL FOR NEXT