Unique invitation of Mahila Gram Sabha to the people of Kundal 
पश्चिम महाराष्ट्र

महिला ग्रामसभेचे कुंडलवासीयांना अनोखे निमंत्रण

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड : भारत सरकार, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय विकास, यशदा या देवतांच्या कृपाशीर्वादाने, मानव विकास निर्देशांक यांची नात व शाश्वत विकास निर्देशांक (रा. नवागाव, ता. हरीयाली, जि. आनंदपूर) यांची कन्या चि. सौ. कां. स्वच्छतादेवी ऊर्फ जलवाहिनी हिचा विवाह महिला बाल कल्याण यांचे नातू व मागासवर्ग कल्याण (रा. शिक्षण, ता. आरोग्य, जि. जीविका) यांचे सुपुत्र ई-ग्रामराज याच्याशी संपन्न होत आहे.... 

अशा आशयाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत असून, या जगावेगळ्या लग्न सोहळ्याचे आयोजन चक्क नवनिर्वाचित पदवीधर आमदार अरुणआण्णा लाड यांच्या कुंडल (ता. पलूस) ग्रामी होणार असल्याचे पत्रिकेत नमूद केले आहे. 

हटके नावाचे वधू-वर आणि कल्पनाशक्ती पलीकडची नातेवाईकांची नावे वाचून, तसेच लग्नपत्रिकेतील वधू-वरांची गावेही जरा विचित्रच वाटली. त्यातच या अभिनव सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्याने नेमका प्रकार काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता; 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बालसभा, सायंकाळी 6 वाजता वंचित घटक सभा आणि 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या महिला ग्रामसभेचे निमंत्रण कुंडलवासीयांना अनोख्या पद्धतीने देण्यासाठीचा हा नावीण्यपूर्ण प्रयोग असल्याचे समोर आले. 

ग्रामीण विकासात लोकसहभाग वाढावा, यासाठी सतत काहीतरी नवे प्रयोग करून गावचा कारभार लोकाभिमुख बनविण्याचा ध्यास जपणारे ग्रामविकास अधिकारी श्रीधर अच्युतराव कुलकर्णी यांची या अनोख्या निमंत्रण पत्रिकेमागची संकल्पना आहे. बालगोपाळांना शिशु वयातच ग्रामसभेची गोडी लागावी. वंचित घटकांना मानवी शाश्वत विकासाची माहिती व्हावी, यासाठी लग्नपत्रिकेद्वारे निमंत्रण करून ग्रामसभा सशक्त करण्याचा उद्देशही असल्याचे जाणवते.

श्रीधर कुलकर्णी हे ज्या गावी सेवेसाठी रुजू होतात तिथे आपल्या अनोख्या कल्पनाशक्तीने ग्रामविकासात लोकसहभाग वाढवण्यात वाकबगार आहेत. चालूवर्षी त्यांनी कुंडल गावचा बनवलेला विकासकामाचा कृती आराखडा राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शक म्हणून स्वीकारला आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

SCROLL FOR NEXT