The University Grants Commission has also included Chandagdi language in the syllabus chandgad marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

चंदगडी भाषा आता युजीसी अभ्यासक्रमात...

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - विद्यापीठ अनुदान आयोगाने चंदगडी भाषेचा समावेश अभ्यासक्रमातही केला आहे. त्यामुळे आता चंदगडी भाषेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. 
‘म्हंगड’, ‘किरमं’, ‘बुरस’ हे शब्द मराठीमधील वाटत असले तरी ते तसे नाहीत. ते चंदगडी या बोलीभाषेतील आहेत. ‘सिक’ हा शब्द मूळचा इंग्रजीमधील. त्याचा अर्थ आजारी; पण चंदगडीमध्ये ‘सिक’ हा शब्द वापरतात आणि तोही आजारी याच अर्थाने. कन्नड, मराठी, कोकणी, इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषेचा प्रभाव असणाऱ्या चंदगडी भाषेवर डॉ. नंदकुमार मोरे यांनी संशोधन केले. दीडशे खेड्यातील सुमारे दोन लाख लोक ही बोलीभाषा बोलतात. त्याचा समावेश शासनाने अधिकृत बोलीभाषेत केला.  

डॉ. मोरे यांच्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आहे. येथील खाद्य संस्कृती, हवामान, माती यावर काही प्रमाणात कोकणाचा प्रभाव दिसून येतो. चंदगड आणि आंबोली परिसरात ही भाषा बोलली जाते. या भाषेवर शिवाजी विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांनी संशोधन केले. या भाषेची वैशिष्ट्ये, त्यातील शब्द, भाषेचा इतिहास या सर्वच अंगांनी मोरे यांनी अभ्यास केला. त्यामुळे ही बोलीभाषा समोर आली. 

त्यांच्या संशोधनामुळे महाराष्ट्र शासनाने बोली भाषा म्हणून चंदगडी भाषेला मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून दहावीच्या कुमारभारतीमध्ये अभ्यासक्रमात समावेश केला. ज्येष्ठ भाषा संशोधक गणेश देवी यांच्या ‘भाषांचे लोकसर्वेक्षण’ मध्येही चंदगडीचा समावेश केला गेला. शिवाजी विद्यापीठाने बी.ए. आणि एम.ए.च्या अभ्यासक्रमात या भाषेचा समावेशही केला. आता या भाषेची दखल विद्यापीठ अनुदान आयोगानेही घेतली आहे. नुकताच युजीसीच्या मराठी भाषेतील नेट, सेट साठीच्या यादीतही याचा समावेश झाला. कोकणी, मराठी, कुडाळी, कन्नड या बरोबरच इंग्रजी, पोर्तुगीज भाषेचाही चंदगडीवर प्रभाव आहे. बरेचसे शब्द या भाषांमधून आले असून चंदगड तालुक्‍यातील बहुतांशी लोक ही भाषा बोलतात.  

भाषेचे विविध पैलु उलगडले

देशातील काही बोली भाषा काळाच्या ओघात लुप्त झाल्या. बोली भाषा या संवाद आणि भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. डॉ. मोरे यांनी चंदगडी भाषेवर संशोधन केले, त्यामुळे या भाषेचे विविध पैलू समोर आले. त्यामुळे भाषेला शासन मान्यता मिळाली. चंदगडी भाषेची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेतली, हे डॉ. मोरे यांच्या संशोधनाचे यश आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT