Unknown man strangled one women doctor 
पश्चिम महाराष्ट्र

लग्न जुळवताना डॉक्‍टर नवरीला नवरदेवाने घातला असा लाखाचा गंडा...

सकाळ वृत्तसेवा

सांगली - एका विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर एकमेकांची ओळख झाली. लग्न जुळता जुळता डॉक्‍टर तरुणी फसल्याचा प्रकार उघडकीस आला. संशयिताने सुमारे एक लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवार (ता.६) ते बुधवार (ता.८) या कालावधीत ही फसवणूक झाली.

विवाह संस्थेच्या साईटवर झाली ओळख

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी या डॉक्‍टर आहेत. विवाहासाठी एका संस्थेच्या संकेतस्थळावर त्यांनी  माहिती भरली होती. त्यावेळी एक प्रोफाईल त्यांना मॅच झाली. त्यांची ओळखही झाली. ओळखीनंतर बोलणे झाले. वराने डॉक्‍टर असल्याचे सांगून डॉक्‍टर वधूचा विश्‍वास संपादन केला. अडचणीत सापडल्याच्या कारणातून पहिल्यावेळी चाळीस हजारांची मागणी केली. त्यावेळी त्याने एक लिंकही शेअर केली. डॉक्‍टर तरूणीने त्यावर चाळीस हजार रूपये पाठविले. त्यानंतर कस्टम कस्टडीत असल्याचे भासवून पुन्हा ६० हजारांची मागणी केली. तीही रक्कम खात्यावर देण्यात आली. परंतू त्यानंतर डॉक्‍टर तरूणीस आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणूकीसह आयटी ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT